राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे देखील भाजपाच्या गळाला ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते पक्षाला राम राम करत आहेत. शरद पवारांच्या दाव्यानंतरही साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. आता साताऱ्याचे दुसरे राजेही भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उदयनराजेंशी फोनवरून संवाद साधला आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी उदयनराजेंना कॉल करून फोन अमित शहा यांच्याजवळ दिला. अमित शहा यांनी उदयनराजेंची विचारपूस करत त्यांना दिल्लीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. या संवादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या सर्व फोन संवादावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले की, संसदेच्या अधिवेशनादरम्यान अशा चर्चा होत असतात. अधिवेशनाच्या काळात सर्वच नेते एकमेकांशी भेटत असतात. उदयनराजे लोकसभेवर निवडून आल्यानंतर साताऱ्यात लावलेल्या पोस्टवर मोदींचे फोटो असल्याची माहिती माधव भंडारी यांनी दिली. आमदार शिवेंद्रराजे यांनी दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता दुसरे राजेही राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न या फोन संवादावरून उभा राहिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त