अमित शहांचं राहुल गांधींना ‘ओपन चॅलेंज’, कलम 370 पुन्हा आणुन दाखवाचं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांना एक आव्हान दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रचारासाठी आलेल्या शहा यांनी प्रचारसभेत सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यावेळी टीका करताना शहा यांनी म्हटले कि, राहुल यांनी घोषणा करावी कि, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर ते काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू करेल.

त्याचबरोबर पुढे गांधी यांच्यावर टीका शहा म्हणाले कि, या कलमामुळे राज्यात झालेल्या दहशतवादामुळे जवळपास 40 हजार नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस केवळ आपली व्होटबँक वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. तुम्ही कधीही गरिबी पहिली आहे का ? असा प्रश्न देखील त्यांनी पवार यांना विचारला.

तुमच्या कुटूंबाला कधी गरिबांच्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे का ? असा प्रश्न पवार यांना विचारला. आम्ही देशभरात 10 कोटी आणि नंदुरबार जिल्ह्यात 1.67 लाख शौचालये बांधण्याचे काम केले असल्याचे शहा यांनी म्हटले. त्याचबरोबर सर्वात जास्त अनुसुचित जाती आणि जमातीचे खासदार हे भाजपचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अनेक आदिवासी भागांचा देखील विकास केला असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

Loading...
You might also like