पाकिस्तान आणि बांगलादेशात ‘अल्पसंख्यक’ घटले पण भारतात वाढले मुस्लिम, HM अमित शहांनी लोकसभेत सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसने धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले असे म्हणत काँग्रेसवर घणाघात केला. कशाप्रकारे 70 वर्षांमध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेश मधील अल्पसंख्यांकांमध्ये घट झाली आणि भारतात ही संख्या वाढली हे देखील शहा यांनी यावेळी सांगितले. काल लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा पास करण्यात आला. या बिलाच्या समर्थनार्थ 311 जणांनी तर विरोधात 80 जणांनी मतदान केले.

यावेळी बोलताना अमित शह म्हणाले, नरकाप्रमाणे आपले जीवन जगात असलेल्यांसाठी हा कायदा महत्वाचा ठरणार आहे तसेच अशा लोकांसाठी हा कायदा फायद्याचा ठरेल असे देखील अमित शहा यावेळी म्हणाले. या कायद्याच्या माध्यमातून त्यांना नक्कीच सुरक्षा मिळेल.

अमित शहा म्हणाले, मनीष तिवारी आणि शशी थरूर आणि इतरांनी 14 व्या आर्टिकल नुसार हे विधेयक असंवैधानिक असल्याचे नमूद केले. रीज़नेबल क्लासिफिकेशनच्या आधारे कायदे करण्यास कोणतीही बंदी नाही. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन केले नसते तर आज मला हा कायदा आणण्याची गरज नव्हती. बांगलादेशची स्वतंत्र स्थापना झाली. दोन्ही देश त्यांच्या अल्पसंख्याकांची काळजी घेतील असा नेहरू लियाकत करार झाला परंतु याची फारशी अंमलबजावणी झाली नाही.

पाकिस्तानचा धर्म इस्लाम आहे, बांगलादेशचा सुद्धा राजधर्म इस्लाम आहे. यासाठीची मान्यता देखील तेथील देशाने दिली आहे. पाकिस्तानमध्ये 1947 ला अल्पसंख्यांकांची लोकसंख्या 23 % होती. जिकि 2011 मध्ये कमी होऊन 3 % वर आली. बांग्लादेशमध्ये सुद्धा 1947 मध्ये 22 % अल्पसंख्यांक होते आणि 2011 मध्ये हीच संख्या कमी होऊन 7 % झाली होती. एकत्र त्यांचे धर्मपरिवर्तन झाले किंवा ते भारतात आले असे स्पष्ट मत अमित शहा यांनी यावेळी मांडले.

Visit : Policenama.com