अमित शहांचा शिवसेनाला ‘इशारा’ वजा ‘निरोप’, महाराष्ट्रात भाजपाला बहुमत मिळेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप राज्यात 288 पैकी 164 जागांवर निवडणूक लढवत असून मित्रपक्ष शिवसेनेला केवळ 124 जागा मिळाल्या आहेत.यावेळी राज्यात भाजपचे प्रदर्शन कसे राहील या प्रश्नावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले कि, भाजप शिवसेना महायुतीला राज्यात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. तसेच भाजपला किती जागा मिळणार या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले कि, निश्चित आकडा सांगणे कठीण आहे, मात्र मागील वेळेपेक्षा जास्त जागा यावेळी येणार आहेत.

3 दशकानंतर युती भाजप मोठा भाऊ
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. त्यावेळी 122 जागांसह भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली होती. 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेना मोठा भाऊ होता. मात्र 2014 मध्ये त्यांनी भाजपपेक्षा कमी जागा जिंकल्याने त्यांच्यातील समीकरण बदलले. आणि 3 दशकानंतर अखेर भाजप युतीमध्ये मोठा भाऊ झाला.

शिवसेनेपेक्षा जास्त जागा
यावेळी भाजप एकहाती सत्ता मिळवणार का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले कि, हे अवघड नाही. महाराष्ट्रातील जनता आमच्यामागे उभी आहे. त्याचबरोबर मागील पाच वर्षात शिवसेना आणि भाजप महायुतीने केलेल्या विकासकांमामुळे जनता आम्हाला पुन्हा एकदा संधी देणार आहे.

नरेंद्र-देवेंद्र फॉर्मूला हिट
अमित शहा यांच्यानुसार, राज्यात देवेन्द्र आणि केंद्रात नरेंद्र हा फॉर्म्युला सध्या हिट असून दोघेही उत्तम काम करत आहेत. महाराष्ट्र केंद्राच्या बरोबर विकास करत असून पहिले सरकार महाराष्ट्राला पाच वर्षांमध्ये 1.22 लाख कोटी रुपये देत असे तर आम्ही पाच वर्षांमध्ये 4.78 लाख कोटी रुपये मदत दिली आहे. मागील पाच वर्षात विरोधक देखील भाजपवर भ्रष्टाचारचा एकही आरोप करू शकली नाही. तसेच केंद्रातील सरकारवर देखील हा आरोप करता आला नाही.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी