Amit Shah | देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं ठरलं होतं पण….; HM अमित शाह यांचा पुण्यात मोठा खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी (Shivsena) मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री (CM) होणार हे ठरलं होतं. पण शिवसेना पलटली. मी खोटं बोललो म्हणतात ठीक आहे, ते मान्य आहे. पण तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला, हिंदुत्व सोडलं, अशा शब्दांत केंद्र गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला चढवला. अमित शहा (Amit Shah) पुण्यातील भाजप (Pune BJP) बूथ कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.

 

अमित शाह (Amit Shah) पुढे म्हणाले, ही तीन चाकी रिक्षा बंद पडली आहे. चाकात हवा नाही. या सरकारच्या हातात राज्य कसं चालेल? हे नक्कामी सरकार आहे. शिवसेना म्हणते ‘सत्ता मेरा जन्मसिद्ध अधिकार किसी भी तरह लेकर रहेंगे’. तुम्हाला आव्हान आहे, निवडणुकीला (election) सामोर जा, तिघांविरोधात लढा. मग बघा तरी काय अवस्था होते, असं थेट आव्हानच शाह यांनी शिवसेनेला दिलं आहे.

 

यांना ऐकायला अडचण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल (Petrol) स्वस्त करायला सांगितलं यांनी दारु (Alcohol) स्वस्त केली. उद्धव ठाकरे सरकार उत्तर द्या, हे वसुली सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

माझी राजकीय सुरुवात बूथ कार्यकर्ता म्हणून
मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बूथ कार्यकर्ता म्हणून केली.
साबरमती विधानसभेचा (Sabarmati Assembly) 1981 चा बूथ कार्यकर्ता होतो.
ही एकमेव पार्टी जिथे बूथचा अध्यक्ष पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो.
अनेकदा हातात बोचनाऱ्या थंडीत कमळ रंगवलं. सतरंज्या टाकल्या पण अध्यक्ष म्हणून निवडताना असं कुणी म्हटलं नाही.
1950 मध्ये जनसंघाच्या जन्माच्या वेळी काय झालं. 70 वर्षात जगातलं सगळ्यात मोठी राजकीय संघटना आहे.
जिथे कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं तिथे सरकार आली.
प्रत्येक मतदारासमोर जाताना छाती मोठी करुन जा तुमच्या नेतृत्वाने कुठलही चुकीचं काम केलेलं नाही, अस शाह यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

 

Web Title :- Amit Shah | Devendra fadnavis was supposed to be the chief minister but uddhav thackeray lied say HM amit shah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘गेल्या 24 तासात कोरोना’च्या 902 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Amit Shah |  ‘मी खोटं बोललो म्हणतात ठीक आहे, एकटं लढून दाखवा’ ! HM अमित शहांचं थेट CM उद्धव ठाकरे यांना ‘ओपन चॅलेंज’

PAN Card Fake or Original | PAN कार्ड बनावट आहे की खरे? तुमच्या फोनचा कॅमेरा करेल खुलासा, जाणून घ्या ट्रिक