केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘डिस्चार्ज’

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना याआधी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 18 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची लागण झाल्यानंतर शाह यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात ते कोरोनामुक्त झाले होते. त्यांनी स्वत:च ट्वीट करुन माहिती दिली होती. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती झालो होतो. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. असेही आवाहन त्यांनी केले होते.