Amit Shah |  ‘मी खोटं बोललो म्हणतात ठीक आहे, एकटं लढून दाखवा’ ! HM अमित शहांचं थेट CM उद्धव ठाकरे यांना ‘ओपन चॅलेंज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ही तीन चाकी रिक्षा बंद पडली आहे. चाकात हवा नाही. या सरकारच्या हातात राज्य कसं चालेल? हे नक्कामी सरकार आहे. शिवसेना म्हणते ‘सत्ता मेरा जन्मसिद्ध अधिकार किसी भी तरह लेकर रहेंगे’. तुम्हाला आव्हान आहे, निवडणुकीला (election) सामोर जा, तिघांविरोधात लढा. मग बघा तरी काय अवस्था होते, असं थेट आव्हानच अमित शाह (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलं आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा येथे भाजप बूथ कार्यकर्ता संवादात अमित शाह (Amit Shah) बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीचा खुलासा केला.

 

अमित शाह म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी (Shivsena) मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री (CM) होणार हे ठरलं होतं. पण शिवसेना पलटली. मी खोटं बोललो म्हणतात ठीक आहे, ते मान्य आहे. पण तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला, हिंदुत्व सोडलं, अशा शब्दांत केंद्र गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

यांना ऐकायला अडचण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल (Petrol) स्वस्त करायला सांगितलं यांनी दारु (Alcohol) स्वस्त केली. उद्धव ठाकरे सरकार उत्तर द्या, हे वसुली सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

 

Web Title :- Amit Shah | fight against all the three parties HM amit shahs direct open challenge to uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PAN Card Fake or Original | PAN कार्ड बनावट आहे की खरे? तुमच्या फोनचा कॅमेरा करेल खुलासा, जाणून घ्या ट्रिक

Sameer Wankhede | मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार ! समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, जाणून घ्या कारण

New Debit-Credit Card Rules | 1 जानेवारीपासून लागू होतील क्रेडिट-डेबिट कार्डचे नवीन नियम, तुम्हाला कसे करतील प्रभावित, जाणून घ्या

Indian Railways | रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्यात येणार नाही अडचण, मिळेल ‘रिझर्व्ह बर्थ’

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार