अमित शहा हिंदुत्वाचे नवे ‘लोहपुरुष’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री अमित शहा यांनी तिहेरी तलाक, काश्मीरचे कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक मंजूर केले. एवढेच नाही तर लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्यावेळी अमित शहा यांनी ज्या प्रकारे उत्तरे दिली त्यावरून भाजपचा हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून अमित शहा हेच पुढे येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संघ आणि भाजपच्या केंद्र स्थानी असलेल्या अनेक गोष्टींवर निर्णय घेत आहेत.

2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शहा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्यावेळी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते, तरीही शहांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख वारंवार केला. अमित शहा हे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यामुळेच मोदी सरकार पुन्हा देशात आल्यावर शहा यांची जबाबदारी वाढवण्यात आली होती. त्यामुळे शहा यांनी संघ आणि भाजपच्या अजेंड्यातील निर्णय घेतले होते.

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भाजप समर्थकांकडून शहा यांचा उल्लेख ‘लोहपुरुष’ असा करण्यात आला होता. एवढेच काय पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच त्यांचे उत्तराधिकारी असल्याचे समजले जाते. या आधी योगी आदित्यनाथ यांच्याकडे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून देखील पाहिले जात होते.

एवढेच काय भाजपमध्ये आता नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच पंतप्रधान होतील असे समजले जाऊ लागले आहे. सध्याच्या सरकारमध्ये देखील अमित शहा मह्त्वाचची भूमिका बजावताहेत. नागरी सुधार कायदा लोकसभेत संमत झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडला जाणार आहे. कलम 370 सुद्धा अमित शहा यांनीच राज्यसभेत मांडले होते त्या वेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित नव्हते.

Visit : policenama.com