नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) कधीपर्यंत तयार होणार याची तारीख जाहिर केली आहे. त्रिपुरा येथे भाजपची जन विश्वास यात्रा (BJP Jan Vishwas Yatra) सुरु आहे. या सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अयोध्या येथे निर्माणधीन असलेल्या राम मंदिराची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की 1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर तयार होईल. त्रिपुरातील लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अमित शाह (Amit Shah) म्हणाले, 2019 मध्ये मी भाजपचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी (Rahul Gandhi) काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, मंदिर वहीं बनाएंगे, तिथी नही बताएंगे. तर राहुल गांधी आता कान उघडून ऐका 1 जानेवारी 2024 रोजी आयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.
#WATCH | Congress hindered the construction of Ram Temple in courts…After the SC verdict came, Modiji began the construction of the temple…Ram Temple will be ready on 1st January 2024: Union Home minister Amit Shah in Tripura pic.twitter.com/d7lZ8eegwS
— ANI (@ANI) January 5, 2023
अमित शहा पुढे म्हणाले, केवळ राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्ष जाऊद्या माँ त्रिपुरी सुंदरी देवीचेही भव्य असे मंदिर बनवू, ते पाहण्यासाठी जगभरातून लोक याठिकाणी येतील. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. महाकाल कॉरिडोर बनवला. सोमनाथ आणि अंबा मातेचे मंदिर सोन्याचे होत आहे. माँ विंध्यवासिनीचे नवीन मंदिर बनत असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.
अनेक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराच्या उभारणीवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)
शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली.
5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली.
आता 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे.
Web Title :- Amit Shah | home minister amit shah announced ram mandir inauguration date 1 jan 2024
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nana Patole | ‘मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या’ – नाना पटोले
Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, ‘आपल्याकडे एक सीएम तर दुसरे…’