‘नागरिकत्व’, ‘जामिया’ आणि इतर मुद्यांवर HM अमित शहांनी दिली ‘उत्तरं’, वाचा – 35 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा विधेयक, एनआरसी, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महाराष्ट्राच्या निवडणूकीचा निकाल, झारखंडच्या विधानसभेच्या निवडणूका यावर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर मुद्दे मांडत विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ‘आज तक’ वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत जवळपास दीड तासात देशातील अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले.

गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाखतीतील मुद्दे –

1. फक्त चार विद्यापीठात गंभीर आंदोलन –
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, देशात जवळापास 224 विद्यापीठं आहेत, ज्यात 22 विद्यापीठात आंदोलनं सुरु आहेत. यातील 4 अशी विद्यापीठे आहेत जेथे गंभीर स्वरुपात आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यांनी सांगितले की बाकी विद्यापीठात छोट्या स्वरुपात आंदोलनं होत आहेत.

2. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकत्व मिळेल, जाणार नाही –
नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व जाणार नाही, मग तो कोणत्याही धर्माचा असो. मी देशातील सर्व अल्पसंख्यांक बांधवांना सांगू इच्छितो की यामुळे तुमचे थोडे देखील नुकसान होणार नाही. कारण या कायद्याने कोणाचे नागरिकत्व जात नाही. हा कायदा फक्त नागरिकत्व देणारा आहे. जर देशात नागरिकत्व देण्याचा आधिकार मिळत आहे तर देशातील मुस्लिम असो किंवा हिंदू कोणालाही नागरिकत्वावरुन घाबरण्याची गरज नाही.

3. कायदा लागू करण्याला विरोध करण्याचा अधिकार नाही –
मुख्यमंत्र्यांना नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करण्याचा अधिकार नाही. जर संसदेत कायदा मंजूर झाला आहे तर तो संपूर्ण देशात लागू होणार आहे. नागरिकत्व केंद्र सुचीचा विषय आहे. जर संसदेच्या दोन्ही सभागृहात कायद्याला मंजूरी मिळाली असेल तर कोणत्याही राज्याला त्याला नाकारण्याचा अधिकार नाही. कायदा बनला आहे आणि तो संपूर्ण देशात लागू होणार.

4. एकजूट होऊन विरोधक अफवा पसरवत आहेत –
देशातील आंदोलनासाठी विरोधक जबाबदार आहेत. त्यांना काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी निशाणा बनवत सांगितले की विरोधक कायद्याविरोधात एकत्र मिळून अफवा पसरवत आहेत.

5. जे नागरिक नाही ते देशाच्या बाहेर जाणार –
एनआरसीवर बोलताना अमित शहा म्हणाले की एनआरसी द्वारे धर्माच्या आधारावर कोणतीही करावाई होणार नाही आणि या अंतर्गत एखादा व्यक्ती देशाचा नागरिक असल्याचे सिद्ध न झाल्यास त्याला देशाबाहेर जावे लागणार. एनआरसी फक्त मुसलमानांसाठी नाही.

6. धर्माच्या आधारे वाटणी काँग्रेसने का मान्य केली –
देशाची वाटणी धर्माच्या आधारे व्हायला नको होती, परंतु काँग्रेसने वाटणीच्या मागणीला मान्य केले आणि देशाचे धर्माच्या आधारे विभाजन झाले. ते म्हणाले की जर धर्माच्या आधारे देशाची वाटणी झाली नसती तर हे विधेयक आणण्याची गरज भासली नसती.

7. हिंसा थांबवणे हा पोलिसांचा धर्म आणि कर्तव्य –
जामिया हिंसाचारावर बोलताना अमित शहा म्हणाले की, जेव्हा हिंसा पसरवली जात असेल तेव्हा ते रोखण्याचा पोलिसांचा धर्म देखील आहे आणि कर्तव्य देखील. जर पोलिसांनी हिंसा रोखण्यासाठी पाऊल उचलले नसते तर आपल्या नजरेत त्यांनी त्यांचे काम योग्य रितीने केले नसल्याचे वाटले असते. ते म्हणाले की जामिया मिलियामधून दगडफेक होते तर बाहेरुन लोक येतात आणि तोड फोड करतात. दंगेखोर दंगा करतात आणि पोलीस शांत राहतील हे कसे होईल.

8. कायद्याला विरोध करण्याआधी पहिल्यांदा तो वाचा –
या कायद्याला विरोध करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी हा कायदा नक्की आहे तरी काय हे वाचावे. त्यामुळे त्यांची शंका दूर होईल. यानंतर शंकांचे निरसन होईल आणि समाधान होईल. यावर सरकार देखील विचारविर्मश करेल.

9. शोकेश मध्ये ठेवण्यासाठी तयार केला होता का एनआरसी –
एनआरसीची कल्पना ही काँग्रेसची आहे. हा कायदा काँग्रेसने शोकेशमध्ये ठेवण्यासाठी आणला होता का ? राजीव गांधी असतानाच आसाम करार करण्यात आला होता.

10. जे 1950 मध्ये निश्चित झाले ते 70 वर्षात झाले नाही –
जेव्हा नेहरु आणि लिजाकत अली कराराचे पाकिस्तानात पालन झाले नाही तेव्हा ही आमची जबाबदारी आहे की आम्ही तेथील अल्पसंख्याकांना शरण देऊ. काँग्रेसने 70 वर्ष या लोकांना नरकातील जीवन जगण्यास प्रवृत्त केले.

11. युगांडातून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व का –
अमित शहांनी काँग्रेसचा सवाल केला की, युगांडातून सर्व हिंदू आले तर काँग्रेसने त्यांनी हिंदूंना नागरिकत्व का दिले.

12. काँग्रेसने शेख अब्दुल्लांनी 11 वर्ष तमिळनाडूमध्ये ठेवले –
आम्ही तर शेख अब्दुल्लांना चांगल्या प्रकारे काश्मीरमध्ये ठेवले आहे. तेथे दोन कॉंस्टेबल देखील आहेत. काँग्रेसने शेख अब्दुल्लांना तमिळनाडूनमध्ये 11 वर्ष नजरकैदेत ठेवले होते. गुलाम नबी आझाद यांना या प्रकरणावर प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.

13. फ्रांसने जर सर्व हिंदूंना बाहेर काढले तर ते कुठे जाणार –
जर उद्या सत्तापरिवर्तन झाले आणि फ्रान्स सरकारने तेथील हिंदूना बाहेर काढले तर ते कुठे जाणार. ते म्हणाले की हिंदूंना कोणी बाहेर काढले तर ते येथे येतील.

14. काँग्रेस गैर मुस्लिमांना सुरक्षा देण्यास बाध्य –
काँग्रेस पार्टीने 25 नोव्हेंबर 1947 साली संकल्प अंगीकार केला आणि सांगितले की पकिस्तानी त्या सर्व गैर मुस्लिमांना सुरक्षा देण्यास बाध्य आहेत. जे त्यांच्या जीवाचा विचार न करता सन्मानाची रक्षा करण्यासाठी सीमापार भारतात येण्यास तयार आहेत.

15. 5 वर्षात 600 मुसलमानांना नागरिकत्व गेले –
आमच्या सरकारने 5 वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान सह दुसऱ्या देशातून आलेल्या 600 मुसलमानांना नागरिकत्व दिले. जगातील कोणत्याही देशातून हिंदू काढण्यात आले तर ते कुठे जातील. 1971 मध्ये इंदिरा गांधींनी सामूहिक नागरिकत्व दिले होते.

16. नेहरुजींनी सांगितले होते की 370 काही काळाने रद्द होईल, आम्ही तो रद्द केला –
भारतीय संंविधानपीठातील जास्तीत जास्त लोक हे काँग्रेसचे होते. 370 रद्द करण्याचा मार्ग काँग्रेसनेच दिला होता. नेहरुंनी तेव्हाच संसदेत सांगितले होते की 370 काही काळाने रद्द होईल, आम्ही ते रद्द केले.

17. पाकव्यप्त काश्मीर भारताचा आहे, भारतात राहणार –
पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे हे म्हणणे आहे की पाकव्यप्त काश्मीर भारताचा आहे आणि भारताच्या सीमेत आला पाहिजे. हा तो मंच नाही की त्यांना येथे घोषणा करता येईल.

18. अयोध्या कायदा काँग्रेसने आणला, आता मान्य का नाही –
1994 मध्ये काँग्रेसने अयोध्या कायदा आणला होता. त्यात म्हणले होते की सर्वोच्च न्यायालय जर हिंदूच्या बाजूने निर्णय घेईल तर जमीन हिंदूंची होईल. मुसलानाच्या पक्षात निर्णय जाईल तर जमीन त्यांना देण्यात येईल. आता सर्वोच्च न्यायालयाने हिंदूच्या पक्षात निर्णय आला तर काँग्रेस यावर आवाज उठवत आहे.

19. पाक, बंग्लादेशचे अल्पसंख्यांक कुठे गेले –
विभाजनानंतर अनेक मुसलमान येथेचं राहिले. पाकिस्तानात 23 टक्के हिंदू होते. आता 3 टक्के आहेत, बांग्लादेशमध्ये 30 टक्के हिंदू होते आता 7 टक्के आहेत. हे सर्व अल्पसंख्यांक कुठे गेले की त्यांचे धर्मांतर करण्यात आले, का त्यांनी भारतात प्रवेश केला.

20. घुसखोरी –
भारत सर्व धर्मांचा देश आहे, परंतु जर कोणी बाहेर जात असेल तर हिंदु मुस्लिम सर्वांसाठी धोकादायक बनत असेल. ते त्यांचे जीवन चालवतात. आपण कधीही नागरिकत्वाला हलकं घेऊ नये. कोणत्याही देशाची सीमा उघडी नसते.

21. तीन तलाक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, आम्ही लागू केला –
तीन तलाकचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, आम्ही तो फक्त लागू केला. परंतु आरोप होतो की आम्ही ते जबदस्ती केले.

22. दिल्ली – बंगाल – झारखंडमध्ये येणार भाजप सरकार –
दिल्लीत आणि पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये भाजप सरकार बनवेल. ते म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रचंड बहुमताने सरकार बनवणार.

23. कोणतीही घाई नाही, 70 वर्षांचा उशीर कमी आहे का –
आम्ही कोणताही निर्णय घेण्यास घाई करत नाही. मागील 70 वर्ष यातच गेले. आता कोणतीही निवडणूक नाही. आम्ही निवडणूकांसाठी हे काही करत नाही. आम्ही सरकार चालवण्यासाठी नाही देशाच्या समस्या सोडवण्यासाठी आलो आहोत. आम्ही राजकारण करु इच्छित नाही, देश उत्तम बनवू इच्छित आहोत.

24. भारत हिंदू राष्ट्र असं मानत नाही –
देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा कोणताही विचार नाही. सरकारचा एकच धर्म आहे संविधान.

25. निर्मला सीतारमण उत्तम काम करत आहेत –
भले की जीडीपीचा ग्रोथ रेट 4.5 टक्क्यांवर पोहोचला असेल, परंतु ही स्थिती पुढे राहणार नाही. ते म्हणाले की अर्थमंत्री सीतारमन यांनी त्यासाठी 8 पावलं उचलली आहेत. ज्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. अर्थव्यवस्था परत मजबूत होईल.

26. 2 क्वार्टर, 5 वर्ष होत नाहीत –
आर्थिक वर्षात दोन तिमाही म्हणजे 5 वर्ष नाहीत, ते म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेईल.

27. महाराष्ट्रात फेल झालो नाही –
महाराष्ट्रात आम्ही फेल झालो नाही. आम्हाला युतीत 160 जागा मिळाल्या जे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळापेक्षा 20 जागा जास्त आहेत. अमित शाह म्हणाले की शिवसेनाने कधीही निवडणूकीआधी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नाही.

28. महाराष्ट्रात आमचा सहयोगी पळाला –
महाराष्ट्रात भाजपचा सहयोगी पाळाला नसता तर राजकीय अस्थिरता निर्माण झाली नसती. सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला परंतु यश मिळाले नाही कारण आमचा सहयोगी पळाला. शिवसेनेने निवडणुकीच्या आधी चर्चा केली असती तर आम्ही दोन पावले पुढे गेलो असतो.

29. मी पीएमच्या रेसमध्ये नव्हतो –
अमित शाहांनी स्पष्ट केले की मी पीएम पदाच्या रेस मध्ये नाही. अमित शाह म्हणाले की, तुम्ही पीएम पदासाठी संकेत देत असाल तर मी अजून खूप जुनिअर आहे. आमच्यातील अनेक नेते वरिष्ठ आहेत. आमच्या पक्षात पार्टी निर्णय घेते. मी रेसमध्ये नाही. आमचे आता एकच स्वप्न आहे की मोदींजी यशस्वी व्हावेत आणि भारत त्या उंचीवर पोहचावा ज्याचे स्वप्न आपल्या नेत्यांनी पाहिले होते.

30. जाती नाही, मेरिटच्या आधारे बनतात नेते –
आमच्या पक्षाचा विचार हा आहे की जाती नाही, मेरिटच्या आधारे नेते निश्चित केले जातात, ते म्हणाले की नेत्यांची लोकशाहीत जातीवाद, ब्लॉकच्या आधारे नाही तर त्यांच्या कार्याच्या आधारे निवड करण्याची सुरुवात पंतप्रधान मोदींनी केली.

31. प्रज्ञा ठाकूर यांना संदेश –
भाजपने प्रज्ञा ठाकूर यांना कडक शब्दात सुनावले आहे. भाजप ना की प्रज्ञा ठाकुर आणि ना की त्यांच्या भावनांचे समर्थन करते.

32. विशेष परिस्थिती प्रज्ञा यांनी तिकिट –
अमित शाह म्हणाले की साध्वी प्रज्ञा सिंहला पक्षाने लोकसभा निवडणूकीत विशेष परिस्थिती आणि अंदाज बांधून तिकिट दिले होते. ते म्हणाले की मी त्यांना अनेकदा कठोर शब्दात सुनावले आहे.

33. बलात्कार प्रकरणातील दोषींना लवकर शिक्षा मिळायला हवी –
महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना लवकर शिक्षा मिळावी. यावर सर्व सहमत आहेत. ते म्हणाले की सरकारने यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे.

34. हैदराबाद एन्काऊंटरवर अमित शाह म्हणाले की –
हैदराबाद एन्काऊंटरमध्ये लोकांचा आनंद, न्याय मिळण्यास होणारा उशीर दर्शवतो. अशा प्रकरणात पीडितांना लवकर न्याय मिळायला हवा.

35. सेंगरवर कारवाईस वेळ का –
एखादे प्रकरण मीडियामध्ये येते तर त्यावर कोणतेही सत्य जाणून न घेता त्यावर तात्काळ कारवाई करणं योग्य नाही. ते म्हणाले की भाजपने दोन नेत्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली आणि दोघांना निलंबित केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/