अमित शहा हे ‘होम मिनिस्टर’ नाही ते तर ‘हेट मिनिस्टर’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अमित शहा हे होम मिनिस्टर नाही तर हेट मिनिस्टर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते दिसून आले. दिल्लीत यंत्रणेचा गैरवापर केला गेला तरीही मतदारांनी भाजपला नाकारले, असा आरोप माकप नेत्या वृंदा करात यांनी केला आहे. तसेच त्यांनी गोली मारो असे वक्तव्य करणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गोली मारो… असे वक्तव्य केले होते. दिल्ली निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुराग ठाकूर यांनी असे म्हणायला नको होते. शहा यांना चूक लक्षात आली असेल तर आता ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणीच करात यांनी केली आहे.

पाकिटमार सरकार
वृंदा करात यांनी केंद्रातील भाजप सरकारवर घाणाघाती टीका केली आहे. वृंदा करात यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करताना हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला अडचण करणारा असल्याचे म्हटले आहे. आता गॅस दरवाढ म्हणजे सर्वसामान्य कुटुंबावरच हल्ला आहे. केंद्रातील हे सरकार पाकीटमार सरकार आहे, अशी घणाघाती टीका वृंदा करात यांनी केली आहे.