Amit Shah | अमित शहांनी चंद्रकांत पाटील यांची भेट टाळली?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation elections) पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे (Maharashtra BJP) प्रमुख नेते दिल्लीत आहेत. रविवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यामध्ये बैठक देखील झाली. दरम्यान, चार दिवसापासून दिल्लीत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची मात्र अमित शहा यांनी (Amit Shah) भेट टाळल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्य पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ दिली गेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्य संघटनेतील प्रमुख व्यक्ती आहेत. अमित शहा यांनी पाटील यांना भेटण्याचे टाळल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शनिवारी दिल्लीला जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर भाजप-मनसे युतीच्या (BJP-MNS alliance) चर्चांना उधाण आले होते. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत दीड तास भेट झाली. पण चंद्रकांत पाटील दिल्लीत गेल्यावर अमित शहा यांनी भेट टाळली.

मुंबई महापालिका बरोबर उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणुकही (Uttar Pradesh Assembly
election) होणार आहे. मनसेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी उत्तर भारतीयांचा मुद्दा सोडलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जिंकायचे आहे. अशातच जर भाजप-मनसे युती झाली तर उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला मोठं फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेससह (Congress) सर्वच विरोधीपक्ष भाजप-मनसे युती होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तूर्त तरी भाजप-मनसे युतीबाबत निर्णय घेणे शक्य नसल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील वाचा

PMSBY | फक्त 1 रुपया दरमहिना खर्च करा आणि मिळवा 2 लाखाचे ‘कव्हर’, ‘या’ पध्दतीनं करू शकता रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

LPG Connection | आता देशभरात एका नंबरवर कॉल करताच मिळेल LPG कनेक्शन, मिस्ड कॉल करून मिळवा सिलेंडर, जाणून घ्या प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Amit Shah | is home minister amit shah avoide to meet chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update