अमित शाह यांचे ‘NRC’ आणि ‘NPR’ बाबत मोठे विधान, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवरून वातावरण तापलेल्या अवस्थेत आहे. अशातच आज केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) अद्ययावतीकरण करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आता लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले असून हे एनआरसी लागू करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे असा दावा करण्यात आला आहे. मात्र अमित शहांनी हे विधान खोडले असून NPR चा NRC शी काहीही संबंध नाही असे महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

”एनआरसी संपूर्ण देशात लागू होणार की काही भागांतच लागू होणार याबाबत सध्यातरी चर्चा झालेली नाही. कॅबिनेट आणि पार्लमेंटमध्येही चर्चा झालेली नाही. याबाबत वाद घालण्याची गरज नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान योग्य आहे,”असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

https://www.pscp.tv/w/1ynJOwqPRLAJR

दरम्यान, जनगणना नोंदणी आणि NPR च्या अद्ययावतीकरणाकरीता कोणतीच कागदपत्रे व बायोमेट्रिक पद्धतीची गरज पडणार नसून स्वयंघोषणेद्वारे स्वतःची नोंदणी करता येणार आहे. या कायद्याअंतर्गत १ एप्रिल २०२० ते ३० डिसेंबर २०२० दरम्यान घराघरात जाऊन जनगणना केली जाणार आहे. आणि यामागील उद्देश म्हणजे देशातील देशातील नागरिकांची व्यापक माहिती गोळा केली जाऊन राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली जाणार आहे.

NPR आणि NRC मधील फरक काय?
NPR आणि NRC खूप फरक आहे. गृहमंत्री अमित शहांनी सांगितले की, देशात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या लोकांची ओळख व्हावी या उद्देशाने देशात एनआरसी लागू करण्यात येणार आहे. तर विविध योजना राबविण्यासाठी मदत व्हावी या उद्देशानं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली जाणार आहे. या अंतर्गत देशात सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींची माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच गरजूंना शासकीय योजनेचा लाभ घेता यावा त्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करण्यात येणार आहे. असे शहांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची सुरुवात २०१० साली युपीए सरकारने मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली केली होती. २०११ मधील जनगणनेच्या आधी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचं काम सुरू झालं होतं. २०२१ मध्ये पुन्हा जनगणना होणार आहे. त्यामुळेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचं काम हाती घेण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/