भाजपकडून संकेत, अमित शहाच राहणार भाजप अध्यक्षपदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर भाजपने आता इतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. या विजयात भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा फार मोठा वाटा आहे. २०१४ मध्ये पहिल्यांदा भाजपाध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी अनेक राज्यांतील विधानसभा निवडणूक असो किंवा नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक असो यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवले. त्यामुळे आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदासाठी कुणाची निवड करायची याची चर्चा सुरु असताना नवीन माहिती समोर येत आहे.

भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी ‘आजतक’ या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे कि, अमित शहा हे २०२२ पर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. ११ कोटी सदस्य असणाऱ्या या पक्षाचे नेतृत्व अमित शहा यांच्याव्यतिरिक्त कुणीही चांगले करू शकत नाही असेदेखील त्यांनी यावेळी सुचवले. त्यामुळे तयार झालेले मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेलं उत्साहाचं वातावरण कमी न करता येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करण्याची तयारी पक्षाची असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी आणि पुढील वर्षी देशातील हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात सत्ता मिळवायची असेल तर अमित शहा हेच एकमेव पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

घटनात्मक अडचणी नाहीत

अमित शहा यांना अध्यक्षपदी राहायचे असेल तर पक्षाच्या घटनेत बदल करावा लागेल अशी चर्चा पूर्वी रंगली होती. मात्र यासाठी घटनेत काहीही बदल करण्याची गरज नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याप्रमाणे ते देखील सलग दोन वेळा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकतात. गृहमंत्री आणि अध्यक्षपद दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी सांभाळण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता अमित शहा २०२२ पर्यंत पदावर राहू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

 

 

Loading...
You might also like