Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Amit Shah On Ajit Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर जाहीर भाषणातून भ्रष्टाचाराचा आरोप केला होता (Allegation Of Corruption) . त्यानंतर काही दिवसातच अजित पवार भाजपासोबत गेले. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यांच्यासोबतच्या नेत्यांना मंत्री करण्यात आले. हा प्रकार देशभरात चर्चेचा मुद्दा झाला आहे.(Amit Shah On Ajit Pawar)

हाच प्रश्न भाजपा नेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांना विचारला असता त्यांनी सारवासारव केली आहे. अशा नेत्याला सोबत का घेतले याचे उत्तरही शाह यांनी दिले नाही. ते इंडिया टुडेच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

आता अजित पवार यांच्यासोबत असलेल्या इतर काही सहकारी नेत्यांच्या ईडी (Directorate of Enforcement – ED), आयकर (Income Tax – IT), सीबीआयच्या (Central Bureau of Investigation-CBI) चौकशा सुरू होत्या. ईडीने गेल्यावर्षी मार्च महिन्यात अजित पवारांच्या घरी जरंडेश्वर साखर कारखान्यातील (Jarandeshwar Sugar Mills) गैरव्यवहारप्रकरणी छापा टाकला होता. यानंतर पंतप्रधानांनी देखील जाहीर आरोप केला होता.

यानंतर अजित पवार महायुतीत गेल्याने त्यांच्या चौकशा थांबल्या का? त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत का? असा प्रश्न अमित शाहांना मुलाखतील विचारण्यात आला.

या प्रश्नाचे उत्तर देताना अमित शाह म्हणाले, कोणावरीलही गुन्हे मागे घेतलेले नाहीत.
सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल. आमच्या मार्गदर्शनानुसार न्यायालय चालत नाही.

अमित शाह म्हणाले, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही हे प्रकरण पुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवतो.
पण इतर अनेक सामान्य नागरिकांचीही प्रकरणे प्रलंबित असतात. त्यांनाही न्याय दिला पाहिजे.

अमित शाह म्हणाले, राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी, पी. चिंदबरम यांच्यावरही गुन्हे दाखल असून त्यांची
प्रकरणे आता कुठे सुरू आहेत. त्यांच्यावर ९-१० वर्षांपासून गुन्हे दाखल आहेत. आम्ही आमचे काम केले.
आता यंत्रणा त्यांची चौकशी करेल.

दरम्यान, अमित शाह यांनी भाजपा सोबत आलेल्या भ्रष्ट नेत्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगितले, पण अशा नेत्यांना भाजपाने सोबत का घेतले, याचे उत्तर मात्र दिले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात