×
Homeताज्या बातम्याAmit Shah On Shraddha Walker Murder Case | महाराष्ट्रातील 'त्या' पोलिसांची चौकशी...

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ पोलिसांची चौकशी होणार – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – Amit Shah On Shraddha Walker Murder Case | श्रद्धा वालकर या तरुणीची राजधानी दिल्लीत निर्घूण हत्या हा देशातील आताच्या घडीचा मोठा प्रश्न झाला आहे. श्रद्धाची तिच्या प्रियकराने आफताब पूनावाला याने हत्या करुन तिच्या शरीराचे 35 तुकडे केले होते. त्यानंतर त्याने ते तुकडे दिल्लीच्या महारौली जंगलात फेकले होते. हा प्रकार आता उघडकीस आला असल्याने या प्रकरणाचा दिल्ली आणि मुंबई पोलीस तपास करत आहेत. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धाने हत्येपूर्वी मुंबई पोलिसांना एक पत्र दिले होते, त्या पत्राच्या आधारावर आफताबवर कारवाई का झाली नाही, याचा तपास करण्यात येईल आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे अमित शहा म्हणाले आहेत. (Amit Shah On Shraddha Walker Murder Case)

श्रद्धा वालकर हिने पोलिसांना दिलेल्या पत्रात आफताब तिला ठार मारण्याची आणि तुकडे करण्याची धमकी सतत देत असल्याचे म्हंटले आहे. नालासोपारा पोलिसांनी श्रद्धाचे हे पत्र स्वीकारल्याचा त्या पत्रावर ठसा आहे. तरी देखील पोलिसांनी पुढे कारवाई न केल्याचे उघड झाले आहे. श्रद्धाने काही काळाने ही तक्रार मागे घेतली होती. पण त्यामुळे तिला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी ऐवढ्या गंभीर पत्राची त्यावेळी दखल का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर अमित शहा यांनी भाष्य केले आहे. (Amit Shah On Shraddha Walker Murder Case)

शहा म्हणाले, श्रद्धा वालकरची ज्याने कोणी हत्या केली, त्याला कमीत कमी कालावधीत कठोरातील कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी दिल्ली पोलीस आणि सरकारी पक्ष प्रयत्न करत आहेत. श्रद्धा वालकर प्रकरणावर आपले लक्ष आहे. ज्याने कोणी श्रद्धाची हत्या केली आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळेल, अशी ग्वाही मी देशाच्या जनतेला देतो. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा कुठलाही अभाव नाही.
त्यामुळे श्रद्धा आणि तिच्या कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल. श्रद्धा वालकरने दिलेल्या पत्रावर कारवाई का केली नाही,
याची चौकशी करण्यात येईल. या पत्राशी दिल्ली पोलिसांचा काही संबंध नाही. हे पत्र मुंबई पोलिसांना दिले होते.
त्यामुळे चौकशी करुन श्रद्धाच्या पत्रावर कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल.

Web Title :- Amit Shah On Shraddha Walker Murder Case | amit shah statement on shraddha walker case maharashtra police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

यावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल

Sakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे

Must Read
Related News