Amit Shah On Shraddha Walker Murder Case | ‘ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कठोर शिक्षा होईल’; गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन

दिल्ली : वृत्तसंस्था – Amit Shah On Shraddha Walker Murder Case | श्रद्धा वालकर खून प्रकरणाला राजकीय रूप देण्यास भाजप कुठेही कमी पडलेली नाही. श्रद्धा वालकरच्या २०२० च्या तक्रारीचा खुलासा झाल्यांनतर तर महाराष्ट्र भाजपने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर हल्ला करून प्रकरण दाबल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या तक्रारींवर कारवाई का झाला नाही याच्या तपासाचे आदेश दिले आहेत. तशीच मागणी आशिष शेलार यांनी देखील केली. आता, या प्रकरणाची दखल दिल्ली दरबारात घेण्यात आली असून भारतचे गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाबद्दल वक्तव्य केले आहे. दिल्ली पोलीस आणि सरकारी पक्ष गुन्हेगाराला कठोर शिक्षा देईल, असे अमित शाह म्हणाले आहेत. (Amit Shah On Shraddha Walker Murder Case)

 

अमित शाह नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला सध्याच्या स्थितीत (कायद्यानुसार) कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल,” असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. त्यांनी पहिल्यांदाच या घटनेबद्दल विधान केले आहे.

 

श्रद्धा वालकर खून प्रकरणाची दिल्ली पोलिस कसून तपासणी करत आहेत.
न्यायालायने आफताबच्या नार्को आणि पॉलीग्राफी चाचणीची परवानगी दिली आहे.
सध्या श्रद्धाच्या शरीराचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आफताब शहरात नवीन असल्याने त्याने तुकडे फेकल्याची निश्चित जागा त्याला आठवत नसल्याचे आफताब म्हणत आहे.
दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी अजून वेळ मागितला आहे.

 

Web Title :- Amit Shah On Shraddha Walker Murder Case | shraddha murder case delhi police will ensure strictest punishment for shraddhas killer amit shah on aftab poonawala

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?