काळजी नको ! महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचं ‘सरकार’ येणार, HM अमित शहा यांनी सांगितलं

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून वाद घातल्याने राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही सरकार स्थापन करता आले नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या पक्षांबरोबर हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. असे असताना केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे.

राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर काळजी करू नका. राज्यात भाजप-शिवसेना सरकार स्थापन करेल असे शाह यांनी सांगितल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ता स्थापनेच्या प्रश्नाला वेगळे वळण लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सरकार स्थापनेचा जनादेश मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप करा, अशी मागणी शिवसेनेनं केली होती.

राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रिय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. यानंतर युती केवळ औपचारिकता असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. त्यातच आज शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याची घोषणा केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. आता शिवसेना विरोधी बाकांवर बसणार असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील सत्ता स्थापनेबद्दल गौप्यस्फोट केला आहे.

Visit : Policenama.com