कलम 370 बाबत अनेकांमध्ये होते गैरसमज, आता वेळ खरा इतिहास लिहिण्याची, अमित शाहांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 वरून केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. काश्मीरविषयी अनेक गैरसमज  होते लोक इतिहासाविषयी चुकीची  माहिती देत  होते. परंतु आता देशाचा खरा इतिहास लिहण्याचा वेळ आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अमित शाह म्हणाले की, ‘काश्मीरबद्दल ज्यांनी चुका केल्या होत्या त्यांनी इतिहास आणि सत्यता लपवून ठेवली. याच कारणामुळे कलम  370 आणि कश्मीरविषयी अनेक अफवा पसरवल्या जात होत्या मात्र आता त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. 1947 मध्ये  काश्मीर हा चर्चेचा आणि विवादाचा विषय होता परंतु इतिहास लोकांसमोर विकृत पद्धतीने मांडला गेला.’

काश्मीरच्या विलीनीकरणासाठी  करावी लागली 2019 पर्यंत प्रतीक्षा –

अमित शहा म्हणाले की, ‘स्वातंत्र्याच्या वेळी 630  संस्थाने भारतामध्ये विलीन करण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही परंतु जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण करण्यासाठी 5 ऑगस्ट 2019 पर्यंत थांबावे लागले. गृहमंत्री म्हणाले की जेव्हा एखादा देश स्वतंत्र असतो तेव्हा सुरक्षा, संविधान बनवणे यांसारखे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. ‘

काश्मिरी पंडित आणि सूफी संतांचा संदर्भ –

काश्मिरी पंडित आणि सूफी संतांचा संदर्भ देताना गृहमंत्री म्हणाले की , कलम 370 मुळे काश्मीरला त्रास झाला आहे. काश्मीरमध्ये सूफी संतांची संस्कृती नष्ट होत आहे.  काश्मिरी पंडितांना या भागातून हाकलून दिले जात  होते. तेव्हा हे मानवाधिकार चॅम्पियन कुठे होते?

अमित शहा म्हणाले, ‘जे लोक आमच्यावर आरोप  करतात त्यांना मी हे सांगू इच्छितो की  जेव्हापासून आमचा राजकीय  पक्ष स्थापन झाला तेव्हापासून हीच  आमची भूमिका आहे. आमचा असा विश्वास आहे की जेव्हा कलम 370  होते  तेव्हा ते  देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी चांगले नव्हते.

Visit : Policenama.com