खुद्द केंद्रीय गृहमंत्रीच म्हणतात, ‘कुंभ असो वा रमजान कोरोना नियमांचे पालन अशक्य’

स्वरूपनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यावरून अनेक कडक निर्बंध लावले जात आहेत. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले. त्यामध्ये ते म्हणाले, ‘कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन करणे शक्य नाही’.

देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी अनेक निर्बंधही लावण्यात आले आहेत. याच कोरोना परिस्थितीवर अमित शाह यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘गेल्या तीन महिन्यांच्या आढाव्यानंतर राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत. देशभरातील राज्ये वेगवेगळ्या पातळीवर लढाई लढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलावीत. सध्यातरी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लावण्याची गरज नाही. पण राज्यात लॉकडाऊन लावण्यावर बंधन नाही. राज्य सरकार निर्णय घ्यायला मोकळे आहेत’.

तसेच निवडणूक प्रचारसभांची वेळ कमी करण्यात आली आहे. आतापर्यंत आम्ही 5 कोटी मास्कचे वाटप केले आहे. मात्र, प्रचारसभांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगालाच आहे, असे ते म्हणाले. याशिवाय कुंभमेळा किंवा रमजान या उत्सवात कोरोना नियमांचे पालन केले गेले नाही. ते होऊही शकत नाही. यामुळे त्यांना आवाहन केले आणि कुंभमेळा प्रतिकात्मकरित्या साजरा करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.