CAA च्या पाठिंब्यासाठी आत्तापर्यंत 52 लाखाहून अधिक Missed Calls : HM अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी म्हणाले की पक्षाकडून सुरु करण्यात आलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ मोहिमेत 52 लाख मिस कॉल देण्यात आले. गृहमंत्री म्हणाले की नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ एका विशेष मोबाइल क्रमांकावर 52,72,000 मिस कॉल आले आहेत. शुक्रवारपासून भाजपकडून सीएएच्या समर्थनार्थ टोल फ्री नंबरवर नागरिकांना मिस कॉल देऊन कायद्याला समर्थन देण्यास सांगितले होते. तसेच पक्षाकडून पक्षाच्या समर्थनार्थ आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी इतर काही मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत.

भाजपकडून सीएएच्या जागरुकतेसाठी रॅली –
जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजपच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की सीएए आणि एनपीआरच्या समर्थनार्थ भाजपकडून काही कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत ज्याद्वारे गैरसमज दूर केला जाणार आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारी भाजपकडून अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात जागरुकता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे कळते आहे.

सीएए विरोधात आंदोलन –
9 डिसेंबरला लोकसभेत नागरिकत्व सुधारणा कायदा पारित झाला तर राज्यसभेत 11 डिसेंबरला पारित करण्यात आला. या कायद्याद्वारे बिगर मुस्लीम शरणार्थांचे जे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून आले आहेत, त्यांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात येईल. कायदा पारित झाल्यानंतर देशात आंदोलन सुरु झाली जी आंदोलने नंतर हिंसेत रुपांतरीत झाली. आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे या कायद्याच्या विरोधात आंदोलने झाली.

दिल्लीत जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसक आंदोलनात पोलिसांनी 50 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आता सीएएच्या विरोधात आंदोलनाचे लोन मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, अहमदनगर, पॉंडेचेरी, पटना अशा शहरात पसरले आहेत. तसेच एनपीआर, एनआरसीच्या विरोधात देखील विविध राज्यात आंदोलने होत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/