दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच बोलले अमित शहा, सांगितली पराभवाची प्रमुख कारणं

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा यांनी या निवडणुकांवर आणि निकालावर भाष्य केले आहे. दिल्लीतील पराभव शहांनी मान्य करत देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला. आणि भारत पाकिस्तान मॅच सारखी वक्तव्य करायला नको असल्याची कबुली देखील दिली आहे. शहा म्हणाले भाजपचा जरी पराभव झाला असला तरी भाजपने आपल्या विचारधारेचा विस्तार केला आहे. तसेच दिल्लीमध्ये भाजप जबाबदार विरोधकाची भूमिका पार पाडेल असे देखील अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

दिल्लीमध्ये आम्हाला 45 जागा मिळतील हा अंदाज देखील चुकल्याचे शहांनी यावेळी सांगितले. तसेच भाजप नेत्यानकडून निवडणुकीच्या काळात केली गेलेली काही वक्तव्य चुकीचे असल्याचे देखील शहांनी यावेळी सांगितले. तसेच सीएए साठी मी तीन दिवसांच्या चर्चेसाठी वेळ देणार असल्याचे देखील शहांनी यावेळी सांगितले.

ठाकूर आणि वर्मा यांची प्रक्षोभक वक्तव्य
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील रिठाला भागात रॅलीतील भाषणात भडकाऊ भाष्य केले होते. ते म्हणाले होते, देशाच्या गद्दरांना, गोळ्या मारा . . ना.

तसेच परवेश वर्मा म्हणाले होते की, दिल्लीमध्ये 500 सरकारी संपत्तीनवर मस्जिद आणि स्मशानांची निर्मिती करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये रुग्णालये आणि शाळांचा देखील समावेष आहे. त्यांनी सांगितले होते की, ज्या ज्या परिसरात हे अनधिकृत काम झालेले आहे ती दिल्ली विकास प्राधिकरण, दिल्ली नगर निगम, दिल्ली जल बोर्ड अशा अनेक प्रकारची सरकारी जमीन आहे.

निवडणूक आयोगाने ठाकूर आणि वर्मा यांच्यावर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 72 ते 96 तास बंदी घातली होती.