नवीदिल्लीराजकीय

दिल्ली निवडणूकीतील पराभवानंतर प्रथमच अमित शाह यांनी दिली प्रतिक्रिया, सांगितले भाजपाच्या पराभवाचे मोठे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील पराभवानंतर जाहिरपणे प्रथमच भाजपाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला पराभव मान्य केला आहे. त्यांनी म्हटले की, देश के गद्दारों को, गोली मारो…, आणि भारत – पाक मॅच सारखी वक्तव्य करणे अयोग्य होते. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पार्टीचे नुकसान झालेले असावे. शाह म्हणाले, भाजपाचा पराभव झाला असला तरी पार्टीने आपल्या विचारधारेचा विस्तार केला आहे. भाजपा दिल्लीत जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल.

गृहमंत्र्यांनी मान्य केले की, त्यांचा दिल्ली निवडणुकीत 45 जागा जिंकण्याचा अंदाज चुकीचा ठरला. ते म्हणाले, माझा अंदाज 45 जागांचा होता, तो चुकीचा ठरला.

त्यांनी त्यांच्या ईव्हीएमने करंट देण्याच्या वक्तव्याचा मात्र बचाव केला. परंतु म्हटले की, भाजपा नेत्यांनी निवडणूक प्रचारात काही अयोग्य वक्तव्य केली होती. भाजपाने नेत्यांच्या त्या वक्तव्यापासून स्वताला वेगळे केले होते.

गृहमंत्री शहा यांनी पीएफआय – शाहीन बाग लिंकवर म्हटले की, पीएफआयबाबत आम्हाला काही तपास यंत्रणांचा अहवाल मिळाला आहे. गृहमंत्रालय याची चौकशी करत आहे. तपासात जे समोर येईल, आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू.

शहा म्हणाले, जे माझ्याशी नागरिकत्व संशोधन कायद्यातील मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असतील त्यांना मी 3 दिवसाच्या आत वेळ देईन.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. तर आपला 62 जागा मिळाल्या आहेत.

Back to top button