भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘त्या’ बंगल्यात राहणार HM अमित शाह !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी आपल्या नव्या निवासस्थानी राहण्यास गेले आहेत. यात विशेष आहे ते म्हणजे याच निवासस्थानी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी राहत होते. हे निवास्थान नवी दिल्लीच्या 6A कृष्ण मेनन मार्गावर स्थित आहे.

2004 ची निवडणूक हरल्यावर या बंगल्यावर राहत होते वाजपेयी –

2004 साली निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वाजपेयी या बंगल्यात राहण्यासाठी आले होते. या बंगल्यात ते कुटूंबसह जवळपास 14 वर्ष राहिले. मागील वर्षी ऑगस्टमध्ये वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर हा बंगला त्यांच्या कुटूंबीयांनी सोडला.

जूनमध्ये अमित शाह यांनी या बंगल्याची पाहणी केली होती, त्यानंतर या बंगल्यात काही बदल करण्यात आले. यानंतर अमित शाह तेथे राहण्यासाठी गेले आहेत. अटल बिहारी जेव्हा या बंगल्यात राहायला गेले होते तेव्हा या बंगल्याचा नंबर 8 बदलून 6 A करण्यात आला होता.

अटल बिहारी वाजपेयी या बंगल्यात शिफ्ट झाल्यानंतर जवळपास एका दशकाने म्हणजेच 2014 साली भाजप पुन्हा सत्तेत आले. सरकारने घोषित केले की दिल्लीतील असे बंगले ज्यात नेते राहतात, त्यांच्या निधनानंतर त्या बंगल्याना स्मारक घोषित करण्यात येणार नाही. सरकारने अटल बिहारी वाजपेयी याचे पहिल्यांदाच सदैव अटल नावाचे स्मारक निर्माण केले आहे जे राष्ट्रीय स्मृति स्थळाच्या जवळच आहे.

आरोग्यविषयक वृत्त –