Advt.

Amit Shah | भाजप तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत, अमित शहांचं ठरलंय?

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका (UP Assembly Election 2022) होणार आहे. यूपीमध्ये सत्ता राखण्यासाठी भाजपने (BJP) चांगलीच कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे लखनऊ दौरा करणार आहेत. यावेळी भाजप सदस्यत्व अभियानाचा शुभारंभ करून पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील.

निवडणुकीआधी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांची संख्या ४ कोटींपर्यंत नेहण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या बैठकीतच तिकीट वाटपावर चर्चा होणार असल्याचे समजते. गत निवडणुकीमध्ये भाजपने ४०३ पैकी ३१२जागा जिंकून उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र अलीकडेच पक्षान केलेल्या एका सर्वेक्षणात निवडून आलेल्या जवळपास १०० आमदारांची कामगिरी निराशाजनक आहे. त्यामुळे यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. इतर नवख्यानां संधी देण्याबरोबरच जातीय समिकरणांचा विचारदेखील केला जाईल.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी अमित शहा (Amit Shah) यांच्यावर देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील पक्षाच्या जागा १० वरून ७३ वर गेल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणूक पार पडल्या. त्यामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवली. एकूणच गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात अमित शहा यांचे विशेष लक्ष आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | इंधनाचा भडका सलग तिसर्‍या दिवशी कायमच; महिन्याभरात पेट्रोलमध्ये 6.79 रुपयांची वाढ

River Improvement Project | ‘नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदी पात्रात भर घालू नका, अन्यथा…’ जलसंपदा खात्याचा पुणे मनपाला स्पष्ट इशारा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amit Shah | UP assembly election 2022 home minister amit shah might cancel ticket 100 bjp mlas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update