अमित शहांना गृहमंत्रीपद मग आमच्यासारखे तरुण मारले जाणार ? हार्दिक पाटील यांचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमित शहा यांची देशाच्या गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर हार्दिक पटेल यांनी शहा यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. पण याबरोबरच आता आमच्यासारख्या तरुणांना मारून टाकले जाणार काय ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. याबरोबरच आपल्याला धमकीचे संदेश मिळत असल्याचा आरोप देखेल त्यांनी केला आहे.

काय आहे पटेल यांचे ट्विट
हार्दिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की,” अमित शहा केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, मात्र आज मला काही समर्थकांचे ‘अब तेरा क्या होगा हार्दिक’ असे संदेश आले”. याचा अर्थ भाजप विरोधात लढणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना आता ठार मारले लाईल का ? चला जशी परमेश्वराची इच्छा !” असे ट्वीट केले आहे.

https://twitter.com/HardikPatel_/status/1134399930536095744

गुजरातमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता. मात्र भाजपने गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ जागांवर काँग्रेसचा सुपडा साफ करून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे वैतागलेल्या हार्दिक यांनी “कांग्रेस नव्हे…बेरोजगारी हरली आहे. शिक्षण हरले आहे, शेतकरी हरले आहेत, महिलांचा सन्मान हरला आहे, सामनान्य जनतेशी जोडलेला प्रत्यक मुद्दा हरला आहे. खरेतर हिंदुस्तानची जनता हरली आहे” असे ट्वीट करून संताप व्यक्त केला होता.