बारामतीत मोदी यांच्याऐवजी अमित शहा घेणार सभा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सभा घेण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीत प्रचार सभा घेतली होती. मोदी हे १६ एप्रिलला पुण्यात मुक्कामाला येत आहे. त्यानंतर १७ एप्रिलला त्यांची अकलुज येथे सभा होणार आहे.

त्याआधी मोदी यांनी बारामतीत सकाळी सभा घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र, त्याला अजूनपर्यंत होकार मिळालेला नाही. त्यामुळे आता अमित शहा यांची बारामतीतील शारदा प्रागंणात १९ एप्रिल रोजी सभा होत आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची २१ एप्रिल रोजी होणार आहे.

भाजपने बारामतीची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील हे गेले महिनाभर बारामतीत ठाण मांडून बसले आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सभा घेतली. त्यात त्यांनी या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्याची घोषणा केली.

योगी आदित्यनाथ खडकवासल्यात

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना देशभरात मोठा प्रतिसाद मिळतो. मोदींनंतर भाजपचे तेच स्टार प्रचारक आहे. त्यामुळे भाजपने त्यांची एक सभा खडकवासला विधानसभा मतदारसंघात आयोजित केली आहे.