अन् … ध्वजारोहणादरम्यान अमित शाहांच्या हातून झेंडा निसटला

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

देशभर आज  मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. देशभरात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात येत आहे. आज नवी दिल्ली  येथे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते भाजप मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. मात्र अमित शाह यांनी झेंडा फडकण्यासाठी रस्सी खेचल्यानंतर तिरंगा एकदम खाली आला. ध्वज स्तंभावरुन झेंडा खाली घरंगळत आला. झेंडा खालीच घसरतोय की काय असे वाटत असताना, अमित शाहांनी दुसरी रस्सी खेचत, झेंडा पुन्हा वर नेला आणि फडकवला.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f18bf3a4-a062-11e8-bab4-d723f62bf2b0′]

हा क्षण पाहून उपस्थित चुकचुकले. पण वेळीच झेंडा फडकल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, अमित शाहांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काँग्रेसचं ट्विटर वरून टीकास्त्र
या प्रकारानंतर काँग्रेसने अमित शाहांवर ट्विटरवरुन टीकास्त्र सोडलं. जे देशाचा झेंडा सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.

“५० वर्षांपेक्षा जास्त देशाच्या तिरंग्याचा तिरस्कार करणाऱ्यांनी जर तो केला नसता, तर आज तिरंग्याचा अपमान झाला नसता. दुसऱ्यांना देशभक्तीचं सर्टिफिकेट देणाऱ्यांना राष्ट्रगीताचं तारतम्य नाही”, असं काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाउंट वरून म्हटले आहे.

पंतप्रधानांचे  भाषण
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होतील, तेव्हा भारत पहिली अंतराळ यात्रा काढेल. भारतीय अंतराळ जाईल, या दृष्टीने वैज्ञानिकांनी पाऊलेही उचलली, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात केला.

७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकार आणि युपीए सरकारच्या कामकाजाची तुलना केली. मोदी सरकारच्या या टर्ममधील शेवटचा स्वातंत्र्यदिन सोहळा आाहे. आपल्या भाषणात त्यांनी देशात राबविल्या जाणाऱ्या योजना, विकास आणि जगातली भारताची बदललेली प्रतिमा यावर प्रकाश टाकला.

‘मला आज देशाच्या नागरिकांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. २०२२ मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असेल तेव्हा देशाचा एक नागरिक, अंतराळात जाईल. त्याच्या हातात तिरंगा असेल. यासोबतच मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल’ अशा शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f806bb7e-a062-11e8-8315-13d260673179′]

काश्मीर मधील आपल्या धोरणाविषयी त्यांनी न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से असे सांगत काश्मीरमध्ये गोळीच्या नव्हे तर गळाभेट घेऊन आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आगामी काळात तेथील ग्रामस्थांनाही महत्त्वाचे अधिकार मिळणार, तिथे पंचायत तसेच महापालिका निवडणुका होतील यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

देशातील दलालांची दुकाने बंद केल्याचा दावा करीत मोदी यांनी सांगितले की, काळा पैसा व भ्रष्टाचाऱ्यांना माफ करणार नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाते. देशातील दलालांचे दुकानही बंद पाडले. गरीबांना दोन रुपये किलो दराने गहू, तांदुळ दिला जातो. त्यातील ६ कोटी बोगस लोकांना बाजूला केले. त्यामुळे देशाचे दरवर्षी ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत.
पंतप्रधान जनआरोग्य योजनेची सुरुवात २५ सप्टेंबरपासून करण्यात येणार असून या योजनेमुळे देशातील कोणतेही गरीब कुटुंब उद्वस्त होणार नाही. या योजनेत देशातील १० कोटी कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी २०१३ आणि आपल्या चार वर्षात झालेल्या बदलाची तुलना केली.

पंतप्रधानाच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
 * टॅक्स भरणाऱ्यांची ४ कोटीहून पावणेसात कोटी
* प्रामाणिक करदात्यांमुळे गरीबांसाठी योजना राबविणे शक्य
* तिहेरी तलाक कायदा येणार
* स्वच्छता अभियानामुळे ३ लाख मुलांचे प्राण वाचले
* पाच कोटी लोक दोन वर्षात गरीबीरेषेतून वर आले
* बलात्कारासारख्या राक्षसी वृत्तीतून देशाला मुक्त करायचे आहे़
* २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार