Amit Thackeray | ‘राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर ‘त्यांचा’ दौरा…’ – अमित ठाकरे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) काढली आहे. या यात्रेवरुन बंडखोर नेते आणि विरोधक टीका करत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी महासंवाद दौरा सुरु केला आहे. आज ते ठाणे शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर त्यांचा दौरा निघाला असता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

राज्यात मनविसे प्रमाणे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही दौरा सध्या सुरू आहे. या दौऱ्याविषयी त्यांना पत्रकारंनी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना विचारले असता, माझा दौरा हा नियोजित दौरा आहे. त्यांचा दौरा आता सुरु झालेला आहे. राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर त्यांचा दौरा निघाला असता का असा प्रश्न पडतो. अशी प्रतिक्रिया देत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

म्हणून रेल्वेने प्रवास करतो
शहरांतील खड्ड्यांविषयी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्यांतील प्रवास टाळण्यासाठी मी रेल्वेने प्रवास करतो, असे अमित ठाकरे यांनी सांगितले. तर नाशिकमध्ये मनसेने विकासकामे केली होती. तेव्हा तेथील रस्त्यांवर खड्डे पडले नव्हते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नागरिकांनी एकदा संधी द्यावी, असेही अमित ठाकरे म्हणाले.

 

तर हात सोडून प्रश्न मार्गी लावू
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे (College Student) प्रश्न, महाविद्यालयातील वाढील प्रवेश शुल्क
अशा विविध मुद्यांसाठी महाविद्यालयांमध्ये मनविसेचे युनिट स्थापन केले जाणार आहे.
महाविद्यालय प्रशासनाला सुरुवातील हात जोडून विनंती करुन प्रश्न मार्गी लावू,
मात्र त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हात सोडून प्रश्न मार्गी लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 

Web Title :- Amit Thackeray | mns amit thackeray targeted shivsena aditya thackeray thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Smriti Irani | ‘बार’वरून स्मृती इराणींच्या वकिलाने काँग्रेसला पाठविली कायदेशीर नोटीस

 

Sandipan Bhumare | ‘शहाणपणा करु नको, तू ये मग दाखवतो’ ! संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची Audio Clip व्हायरल

 

MTNL Prepaid Plan | अवघ्या 47 रुपयात 90 दिवसापर्यंत चालू राहील सिम, सोबत मिळतील 500 SMS, पहात राहीले Jio-Airtel-Vi!