मनसेकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा ! आदित्य ठाकरेंच्या ‘पर्यटना’वर अमित ठाकरेंचा ‘वॉच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर आणि मंत्रिमंडळावर धाक ठेवण्यासाठी मनसेकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन खाते असून त्या खात्यावर अमित ठाकरे वॉच ठेवणार आहेत. त्यामुळे आगामी काळात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळू शकतो.

मनसेचा 14 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज पार पडला. या दरम्यान मनसेचे अनिल शिदोरे यांनी मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर केले. यावेळी अमित ठाकरे यांच्याकडे ग्रामविकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे आदित्य ठाकरेंच्या कारभारावर कसे लक्ष्य ठेवतात हे पाहणे आवश्यक आहे.

कोणाकडे कोणती जबाबदारी –
गृह खातं – बाळा नांदगावकर
ग्रामविकास खातं – जयप्रकाश बाविसकर, प्रकाश भोईर
आपत्ती आणि मदत – संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिष सारस्वत, संचोष धूरी, ललित यावलकर
शालेय शिक्षण – अभिजीत पानसे, अदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर आणि अमोल रोगो
कामगार – राजेंद्र वागस्कर, गजानन राणे, सुरेंद्र सुर्वे
नगरविकास – संदिप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुणकर, किर्ती शिंदे, हेमंत कदम, संदिप कुलकर्णी, फारुक डाळा
सहकार – रिटा गुप्ता यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कौस्तूभ लिमये, वल्लभ चितळे
मत्सविकास – महेश जाधव, विशाल पिंगळे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, परशुराम ऊपरकर, निशांत गायकवाड
महिला व बालविकास – शालिनी ठाकरे
सार्वजनिक बांधकाम – सामाताई शिवलकर, संजय शिरोडकर
रोजगार हमी – बाळा शेंडगे, आषिश पूरी
सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर
कृषी – संजीव पाखरे, अजय कदम
कौशल्य विकास – स्नेहल जाधव
अल्पसंख्यांक विकास – अल्ताफ खान, जावेद तडवी
भटक्या विमुक्त जाती – गजानन काळे
ग्राहक संरक्षण – प्रमोद पाटील
आदिवासी विकास – आनंद एमबडवाड, किशोर जाचक, परेश चौधरी
पर्यावरण – रुपाली पाटिल, किर्तीकुमार शिॅदे, देवव्रत पाचिल
क्रिडा खाते – अमिता माझगावकर यांच्याकडे खार जमिनी आणि भूकंप पुनर्वसन, विठ्ठल लोकणकर

या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांनी सक्त ताकीद दिली आहे की, ब्लॅकमेलिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आरटीआय टाकण्यात येऊ नये. तसेच मला सांगितल्याशिवाय पत्रकार परिषदा घेण्यात येऊ नये. याशिवाय मनसे पदाधिकारी नसलेले परंतु या शॅडो कॅबिनेटमध्ये काम करण्याची इच्छा असलेले यात काम करु शकतात, त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील राज ठाकरेंनी यावेळी केले.