home page top 1

वर्ल्डकप २०१९ : …म्हणून बिग बी अमिताभ, ऋषी कपूर ICCवर ‘नाराज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात क्रिकेट म्हटलं की एक सण म्हणूनच पाहिला जातो आणि जर इंडिया विरुद्ध पाकिस्तान अशी मॅच असेल तर भारतात एक वेगळेच वातावरण असते. परंतू सध्या क्रिकेट व‌र्ल्ड कप वर पावसाचे सावट असल्याने सगळीकडे गोंधळाचे वातावरण आहे. पावसामुळे मागील वेळी भारत विरुद्ध न्युझीलंड सामना रद्द करावा लागला, परंतू आता येणार सामना भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण येणारा सामान्यात भारत विरुद्ध पाकिस्तान असा असल्याने त्यावेळी देखील पाऊस झाला तर क्रिकेट चाहत्यामध्ये नाराजी असेल. यामुळे लाखो चाहते सामन्यावेळी पडणाऱ्या पावसावर मजेशीर ट्विट करत आहेत यात आता बॉलिवूड मधील कलाकार देखील मागे राहिले नाहीत. बिग बी अमिताभ बच्चन पासून ऋषि कपूर यांनी देखील ट्विट करत आपली नाराजी उघड केली आहे.

वल्ड कप भारतात शिफ्ट करावा –

पावसाच्या क्रिकेटमधील सततच्या व्यत्ययामुळे अनेकांनी ट्विट करत ICC ला दोष दिला आहे. यामुळे सध्या ट्विटवर #ShameOnICC हा हॅशटाग ट्रेंडमध्ये आहे. यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत व‌र्ल्ड कप टूर्नामेंट भारतात शिफ्ट केली पाहिजे कारण भारतात पावसाची आवश्यकता आहे.

ऋषि कपूर यांनी देखील एक कॉमेडी ट्विट केले आहेत. त्यात त्यांनी व‌र्ल्ड कपचा फोटो टाकत मस्करी केली आहे. त्यांनी छत्री सारख्या ट्रॉफीचा फोटो ट्विट केला आहे आणि लिहले आहेत की हे ICC क्रिकेट व‌र्ल्ड कपचे डिझाईन आहे.

सध्या व‌र्ल्ड कप दरम्यान पाऊस सुरु असल्याने अनेक सामने रद्द झाले आहेत, पावसाच्या व्यत्ययामुळे क्रिकेट प्रेमी देखील निराश झाले आहेत. आता पुढील सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान असणार आहे आणि त्या दरम्यान जर पाऊस झाला तर क्रिकेट चाहते तर ICC वर नाराज होण्याची चिन्ह आहेत.

सिनेजगत

‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

 

Loading...
You might also like