तब्बल २५ वर्षांनी अमिताभ बच्चन झळकणार ‘या’ मराठी सिनेमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे महानायक सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीतील आपले वर्चस्व गाजविले. त्यांचे चित्रपटसृष्टीमध्ये मोलाचे स्थान आहे. त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. अमिताभ यांचे लाखो चाहते आहे. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. व त्यामध्ये मोलाची भूमिका साकारली आहे. त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या चाहत्यांना एक खुशखबर आहे.

 

अमिताभ हिंदी चित्रपटातून आता मराठी चित्रपटात पाऊल टाकणार आहे. तब्बल २५ वर्षांनी अमिताभ बच्चन हे मराठी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘ए बी आणि सी डी’ असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद लेले असणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला २० पासून सुरुवात होणार आहे. सलग पाच दिवस या चित्रपटाचे शुटिंग अमिताभ बच्चन करणार आहे. अमिताभ मराठी चित्रपटात झळकणार आहे हे ऐकताच चाहते खुप आनंदी झाले आहेत.

View this post on Instagram

Work Excites !

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी यापुर्वी १९९४ मध्ये ‘अक्का’ चित्रपटात काम केले आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘ए बी आणि सी डी’ मध्ये यांच्या बरोबर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विक्रम गोखले हे अमिताभ यांच्या जिवलग मित्राची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी दोघांची जोडी ‘अग्निपथ’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like