…म्हणून अमिताभ बच्चननं गुरूव्दारा कमेटीला दिलेले 2 कोटी रूपये परत करण्याची होतेय मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या या संकटात अनेक संघटना आणि लोक आपआपल्या परीने समाजाची सेवा करत आहेत. काही लोक दानधर्मही करत आहेत. त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील गुरुद्वारा रकाब गंज साहिबमध्ये सुरु करण्यात आलेल्या श्री गुरु तेग बहादूर कोविड केअर सेंटरला दोन कोटी रुपयांचे दान दिले आहे. मात्र, दिलेले हे दान अमिताभ बच्चन यांना परत करावे, यासाठी मागणी केली जात आहे.

अमिताभ बच्चन यांनी हे दान दिल्यानंतर आता उत्तर प्रदेश अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सरदार परमिंदर सिंह यांनी टीका केली आहे. त्यासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आणि अध्यक्ष सरदार मजिंदर सिंह सिरसा यांना दिलेले दान परत करण्याची मागणी केली आहे. सरदार परमिंदर सिंह यांनी सांगितले, की ‘अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्ली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीला कोविड सेवांच्या पार्श्वभूमीवर 2 कोटी रुपये दान दिले आहेत. दिल्ली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आणि अध्यक्षांकडे विनंती आहे, की त्यांनी तिसरे गुरुच्या वेळी बादशाह अकबर अनेक गाव, गुरुघर बनू इच्छित होता. मात्र, तिसऱ्या गुरुने हे स्वीकार केला नाही. कारण ती अकबरची कमाई नव्हती’.

तसेच त्यांनी पुढे म्हटले, की हेच ते अमिताभ बच्चन आहेत त्यांनी 1984 मध्ये शीख दंगलीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखांविरोधात दंगल भडकावली होती. अशा लोकांकडून दान स्वीकारले तर शीख समाजासाठी श्रेयस्कर नसेल. त्यांच्या मूल्यांविरोधात असेल. शीख समाजाकडे पैशांची कमतरता नाही. माझी विनंती आहे की, अशी कोणतीही व्यक्ती आहे की त्याने मानवतेविरोधात काम केले असेल तर त्यांच्याकडचा एकही रुपया घेऊ नये.