Amitabh Bachchan | सासऱ्यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘पॅरिस’हुन परतल्या सुनबाई.

पोलीसनामा ऑनलाईन – Amitabh Bachchan | कालच्या 11 ऑक्टोबर पासून दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 80 वयामध्ये पाऊल टाकले आहे. प्रत्येक शहरामध्ये ‘बिग बी’ यांच्या चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावरती त्याचे फोटोज आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत.

लॉरियल पॅरिस फॅशन वीक (l’oreal Paris Fashion Week 2021) मध्ये विश्व् सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने सहभाग घेऊन पॅरिस मध्ये आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करत सर्वांनाच घायाळ केले आहे. फॅशन वीक झाल्या नंतर अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या मुलगी आराध्या सह पॅरिस फिरले आहेत त्याचे देखील फोटोज सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहेत. कालच्या 11 ऑक्टोम्बरला ‘बिग बी’ म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चनचे सासरे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 80 वयामध्ये पाऊल टाकले आहे. सासऱ्यांच्या वाढदिवसा निमित्ताने काल अभिषेक पत्नी ऐश्वर्या मुलगी आराध्या सह मुंबईच्या एअरपोर्ट वरती स्पॉट करण्यात आले.

 

 

घरी परतल्यानंतर ‘बिग बी’ यांचा वाढदिवस साजरा करून ऐश्वर्याने फोटोज सोशल मीडियावरती पोस्ट केले आहेत. (Viral Photo’s) त्यातील एक फोटो हा मुलगी आराध्या आणि सासरे अमिताभ बच्चन यांचा आहे. कॅप्शन मध्ये लिहीत – हार्ट ईमोजी आणि “Happy Happy Birthday Dearest Dadaji-Pa Love You Forever And Beyond” आजोबा आणि नातीच्या प्रेमळ दृश्याला चाहत्यांकडून शुभेच्छा देत भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने देखील जुने फोटोज शेयर करत वडील अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले आहे – माझे हिरो, माझे आदर्श, माझे मित्र, माझे वडील. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. लव यू !’

हे देखील वाचा

Corona Vaccination | भारतात 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी Covaxin ला मंजुरी

शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अ‍ॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Amitabh Bachchan | aishwarya rai share cute picture of aaradhya with dadu amitabh bachchan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update