बिग बी चं बारामतीत आगमन ; चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केलं स्वागत

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –   बारामती येथील विमानतळावर बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन याचं आगामी चित्रपटातील एका प्रसंगाचं चित्रीकरण होणार आहे. चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्यासमवेत अभिनेता अजय देवगण हे बारामती येथे गेले होते. त्यावेळी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बारामतीच्या विमानतळावर चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केलं आहे.

स्टार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यांच्या या येणाऱ्या चित्रपटाचं नाव मेडे असं आहे. मेढे या चित्रपटाचं नुकतच चित्रीकरण करण्यासाठी ते बारामती येथे गेले होते. दरम्यान, मेडे’ हा अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन तो स्वत:च करणार आहे. शिवाय या चित्रपटात तो मुख्य व्यक्तिरेखा साकारताना देखील दिसेल. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलरपट आहे. या चित्रपटात अजयसोबत अमिताभ बच्चन, रकूल प्रित सिंह देखील झळकणार आहेत. तर अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

तर मेडे या चित्रपटाचं चित्रीकरण होत आहे हे काही जणांनाच माहित होत, तरी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास बिग बी आणि अजय देवगण यांचं बारामती विमानतळावर आगमन झालं त्यावेळी सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे बंधू रणजित पवार यांनी या बॉलिवूड कलाकारांचं मोठ्या उत्साहात बारामतीकरांनी त्यावेळी स्वागत केलं आहे.