अमिताभ बच्चन यांच्या आवाजात उपलब्ध होणार ‘Alexa’, Amazon सोबत केली ‘पार्टनरशिप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी अ‍ॅमेझॉनबरोबर पार्टनरशिप केली आहे. या भागीदारीअंतर्गत अलेक्सा सेलिब्रिटी व्हॉईसमध्ये प्रथमच भारतात उपलब्ध होईल.

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना अमिताभ बच्चन यांचा आवाज अलेक्सा मध्ये भारतात मिळेल. यासाठी अमिताभ बच्चन यांना व्हॉईस एक्सपीरियन्स खरेदी करावा लागणार आहे. तथापि, हे वैशिष्ट्य पुढील वर्षापासून उपलब्ध होईल.

अ‍ॅमेझॉन इंडियाने म्हटले आहे की Amazon Alexaची टीम अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करेल जेणेकरुन त्यांचा आवाज अलेक्सासाठी अधिक चांगल्या देता येऊ शकेल.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजात अलेक्साच्या लोकप्रिय ध्वनी कामांड्स सापडतील. विनोद, हवामान, कविता, प्रेरक कोट आणि सल्ला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात उपलब्ध असतील.

अलेक्सा व्हॉईस एक्सपीरियन्सच्या या पार्टनरशिपवर अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की याबद्दल मी खूप उत्सुक आहे. व्हॉईस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी असे काहीतरी तयार केले ज्यामुळे ते आपल्या प्रेक्षकांशी आणि हितचिंतकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतील.

अलेक्सा, अ‍ॅमेझॉन इंडियाचे कंट्री हेड पुनीश कुमार म्हणाले की, अमिताभ बच्चन यांचा आवाज बॉलिवूडबरोबर वाढलेल्या सर्व भारतीयांसाठी संस्मरणीय आहे.

पुनीश कुमार म्हणाले आहेत की, ‘जेव्हा अलेक्सा वापरताना ग्राहकांना अमिताभ बच्चन यांच्या आवाजात उत्तर मिळेल तेव्हा आम्हाला काय प्रतिसाद मिळणार हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

अमिताभ बच्चन व्हॉईस एक्सपिरियन्स खरेदी करण्यासाठी वापरकर्त्यांना स्वतंत्रपणे किती पैसे द्यावे लागतील याबाबद्दलचे कोणतेही स्पष्टीकरण कंपनीने अद्याप दिले नाही.