Photos : ‘बिग बी’ अमिताभ आजही खरेदी करू शकलेले नाहीत वडिलांच्या स्वप्नातील हे घर ! काय आहे कारण ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भली मोठी संपत्ती आहे. त्यांचे अनेक बंगलेही आहेत; परंतु एक त्यांचं स्वप्न असं आहे जे आजही अपूर्ण आहे. बिग बी त्यांच्या वडिलांच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकलेले नाहीत. यासाठी त्यांनी खूप प्रयत्नदेखील केले, परंतु त्यांचं हे घर खरेदी करण्याचं स्वप्न आजही पूर्ण झालेलं नाही.

अलाहाबादमध्ये एक घर आहे. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि अमिताभ यांची आई तेजी बच्चन कधी याच घरात भाड्यानं राहात होते. 1984 मध्ये अमिताभ यांनी पहिल्यांदा हे घर खरेदी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती; परंतु ती ट्रस्टची संपत्ती असल्यानं त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

सोशलरवरून शेअर केले होते घराचे फोटो

वडिलांची आठवण म्हणून अमिताभ यांना हा बंगला खरेदी खरायचा होता. यासाठी त्यांनी नाही नाही ते प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळालं नाही. एकदा त्यांनी या घराचे फोटोही सोशलवर शेअर केले होते. सोबत त्यांनी एक पोस्टही लिहिली होती. या पोस्मटमधून त्यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या.

कोण आहे बंगल्याचे मालक ?

रिपोर्टनुसार, इटावाचे नामवंत वकील शंकर तिवारी हे बंगल्याचे मालक होते. शंकर तिवारी आज हयात नाहीत. या बंगल्यात आता कुणीच राहात नाही. ट्रस्टचे सदस्य आणि वकील केके पांडे हे या बंगल्याची देखरेख करतात. पांडे आणि तिवारी यांचंही घर बंगल्याच्या शेजारीच आहे.

10 द्वारांचा बंगला म्हणून ओळखला जातो बंगला

हरिवंशराय 1939 साली कटघर भागातील घऱ सोडून क्वाईव मार्गावरील या घरात भाड्यानं राहायला गेले होते. हे घर म्हणजे एक प्रशस्त बंगला आहे. यात 3 प्रशस्त खोल्या आहेत. याला 10 एन्ट्री गेट आहेत. याला 10 द्वारांचा बंगला म्हणूनही ओळखलं जातं. यातील काही खोल्यात कधी काळी हरिवंशराय आणि तेजी बच्चन राहात असे. पुढं ते दिल्लीला शिफ्ट झाले. परंतु या घरात त्यांच्या अनेक आठवणी होत्या.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शूटिंग झाली आहे.