Coronavirus : ‘बिग बी’ अमिताभ यांच्यानंतर अभिषेक देखील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक यांचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याबाबत अभिषेक यांनी देखील ट्विट केलं आहे.

काही वेळापूर्वीच बिग बी आणि अभिषेक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या इतर कुटुंबीयांची देखील चाचणी झाली आहे पण अद्याप रिपोर्ट आलेले नाहीत. गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी असे अमिताभ यांनी ट्विट करून सांगितलं आहे.


दरम्यान, अमिताभ आणि त्यानंतर अभिषेक यांना कोरोना झाल्याचे समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘बिग बी’ यांच्या मुलीला देखील थोडा त्रास होतो आहे पण त्यांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. अभिषेक यांनी ट्विट करत घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.