Amitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून तुमच्या देखील डोळयात पाणी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amitabh Bachchan | बाॅलिवूडमधील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चनने (Amitabh Bachchan) बाॅलिवूडमध्ये एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या अभिनयाला केवळ भारतातच नाही तर जगभरातून पसंती मिळत असते. अलिकडे अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये जास्त दिसत नसले तरी ‘कौन बनेगा करोडपती’ KBC (Kaun Banega Crorepati) या शोवर ते नहमीच दिसतात. अशातच कौन बनेगा करोडपतीचे १००० एपिसोड्स पुर्ण झाले आहे. ज्या निमित्त सेलिब्रेशन करण्यात आलं होतं.

 

 

 

 

कौन बनेगा करोडपतीच्या सेट्सवर बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि तिच्यासोबत नव्या नंदा (Navya Nanda) देखील उपस्थित होती. यावेळी या शोचे 1000 एपिसोड पुर्ण झाले असून तुम्हाला कसं वाटतं आहे, असा सवाल श्वेताने केला. यावर उत्तर देताना अमिताभ बच्चने (Amitabh Bachchan) भावूक होऊन करोडपतीचा प्रवास सांगितला.

 

 

आपला प्रवास सांगत असताना आपल्याला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते,
म्हणून अमिताभ बच्चनने ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati)
होस्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
तसेच यावेळी त्यांना मोठ्या पद्यावरुन छोट्या पड्यावर जात असल्याची जाणीव देखील करुन देण्यात आली होती.
त्यावेळी त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे काम नव्हती म्हणून त्यांनी हा शो घेतला.

 

या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित होताच लोकांच्या प्रतिक्रीयाने जणू जग पलटून गेलं असल्याचं अमिताभने यावेळी म्हटलं आहे.
तर इथे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून मला काहीतरी शिकायला मिळतं,
असं देखील ते यावेळी म्हणाले. यादरम्यान अमिताभ बच्चन प्रचंड प्रचंड भावूक (Emotional) झाले असून त्यांना अश्रू अनावक झाले.

 

Web Title :- Amitabh Bachchan | amitabh bachchan got emotional on kaun banega crorepati 13 as he remember kbc journey said i was not getting work video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा