Big B अमिताभच्या जीवनातील ‘तो’ दिवस ! सकाळी कोणीच ओळखलं नाही, सायंकाळी बनले STAR

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमधील मेगास्टार बिग बी आमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना स्टारर आनंद हा सिनेमा रिलीज होऊन आज 48 वर्षे पूर्ण झाली. 12 मार्च 1971 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. स्टोरी आणि अ‍ॅक्टींगमध्ये सिनेमानं इतिहास रचला. ऋषीकेश मुखर्जीनं सिनेमा डायरेक्ट केला होता. बिग बींनी सिनेमातील काही आठवणी सोशलवर शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, कसं या सिनेमामुळं ते रातोरात सुपरस्टार झाले. एका चाहत्याचं ट्विट त्यांनी रिट्विट केलं आहे.

आनंद हा अमिताभ यांच्या करिअरमधील सुरुवातीचा सिनेमा आहे जेव्हा त्यांना खास स्टारडम नव्हतं मिळालं. मोठ्या मुश्कीलीनं लोक त्यांना ओळखत होते. बिग बींच्या एका चाहत्यांना ट्विट केलं आहे की, “आनंद सिनेमा रिलीज होईपर्यंत लोक त्यांना ओळखत नव्हते. नंतर त्यांचा आनंद सिनेमा रिलीज झाला. ते सकाळी कारमध्ये पेट्रोल भरायला गेले कोणी त्यांना ओळखळं नव्हतं. त्याच सायंकाळी जेव्हा ते पुन्हा पेट्रोल पंपवर आले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमा झाली होती. लोक त्यांना ओळखत होते.”

बिग बींनी हे ट्विट रिट्विट करत लिहिलं की, “होय, हे खरं आहे. इरला येथे एस व्ही रोडवर एक पेट्रोल पंप आहे.” आनंद हा सिनेमा अमिताभ यांचा पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमात राजेश खन्ना यांनी कॅन्सर रुग्णाची भूमिका साकारली होती.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर अलीकडेच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.