‘कोरोना’मुळं पोलिस हवालदाराचा मृत्यू झाल्यानंतर ‘बिग बी’ अमिताभनं व्यक्त केला ‘शोक’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे वाकोला पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला. ते 57 वर्षांचे होते. मुंबई पोलिसांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनीसुद्धा ट्विट करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे.

Advt.

हेड कॉन्स्टेबलच्या मृत्यू ‘ही अत्यंत दु:खद बातमी आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या धैर्याला सलाम’, असे ट्विट बिग बींनी केले आहे. सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. अशातच कोरोनामुळे हेड कॉन्स्टेबलच्या मृत्यूची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो व कुटुंबीयांना धैर्य मिळो अशी प्रार्थना मुंबई पोलिसांनी या ट्विटद्वारे केली.