अमिताभ बच्चन यांनी मृत्यूपूर्वी त्यांची सर्व प्रॉपर्टी ‘यांना’ देण्याची केली घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘कौन बनेगा करोडपती’ च्या येणाऱ्या नव्या सीझनमुळे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आहेत. 9 ऑगस्टपासून ‘कौन बनेगा करोडपती’ चे 11 वे सीझन सुरु झाले आहे. या शो मध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक सिंधुताई सपकाळ यांनी केबीसीच्या पहिल्या ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’मध्ये आपला सहभाग नोंदवला. सिंधुताईं यांनी कथन केलेला त्यांचा संघर्ष ऐकून अमिताभ बच्चन भावूक झाले व त्यांनी आपल्या मालमत्तेबाबत घोषणा केली.

अमिताभ म्हणाले की, ‘मी एक गोष्ट बर्‍याचदा बोलतो. माझी मालमत्ता माझ्या दोन मुलांमध्ये (अभिषेक आणि श्वेता) मध्ये समान प्रमाणात वाटण्यात येईल. त्यांचे हे वाक्य ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवून या गोष्टीचे स्वागत केले.

सिंधुताईंना ‘अनाथांची आई’ आणि ‘महाराष्ट्राची मदर टेरेसा’ म्हणतात. त्यांनी अत्तापर्यंत 1200 मुलांना दत्तक घेतले असून त्यांना 36 सूना आणि 272 जावई आहेत. सिंधुताई म्हणतात की, ज्याला आई नाही त्याची मी आई आहे. सिंधुताईंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयसह सुमारे 500 पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राष्ट्रपति पुरस्कार, अहिल्याबाई पुरस्कार यासह 750 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय सिंधुताईंच्या जीवनावरही चित्रपट बनवला गेला आहे. काल झालेल्या खेळात सिंधुताईने केबीसीकडून 25 लाख रुपये जिंकले.

आरोग्यविषयक वृत्त –