‘या’ कारणामुळं ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी माफी मागितली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडल्यामुळे 25 व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी उपस्थिती न लावल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे. आता त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते आपल्या भावना व्यक्त करत आहे. अमिताभ यांनी फेस्टिवलला न पोहोचताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली प्रतिक्रिया चाहत्यांसमोर ठेवली आहे.

 

amitabh bachchan

हा व्हिडिओ कार्यक्रमाच्या समाप्ती सोहळ्यावर दाखविण्यात आला होता आणि आता तो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ म्हणाले, ‘माझ्या आवडत्या शहरांपैकी एक म्हणजे कोलकाता तेथे 8 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत केआयएफएफचे उद्घाटन होते. दुर्दैवाने काही कारणांमुळे मी तेथे पोहोचू शकलो नाही. परंतु मी भाषण तयार केले आहे. मी विचार केला की, तुमच्यासाठी हे वाचणे योग्य असेल. तुम्ही मला क्षमा कराल अशी आशा आहे.’

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

https://www.youtube.com/watch?v=afOM3Eh_JJ4&feature=youtu.be


अमिताभ म्हणाले की, ‘प्रत्येक वेळी प्रतिष्ठित कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट रौप्यमहोत्सवी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आभारी आहे. उत्सवाबद्दल शुभेच्छा.’ व्हिडिओमध्ये, अमिताभ हे तेजीने वाढणार्‍या डिजिटल एंटरनेटमेंट जगातील चित्रपटगृहांविषयी चिंता व्यक्त करताना दिसले. अमिताभ म्हणाले की, आधी चित्रपट मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित व्हावेत, त्यानंतर ते ऑनलाईन किंवा आपल्या उपकरणांवर आले पाहिजेत.

अमिताभ म्हणाले की, ‘आज पुरुष आणि स्त्रिया एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत, तेव्हा मनोरंजनाचे बरेच पर्यायदेखील उघडले गेले आहेत, सामग्री आपल्या घरात पोहचली आहे. परंतु मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याचा उत्साह नेहमीच तिथेच असेल. ही परंपरा जपण्याचे मार्ग शोधून काढावे लागतील. आधी सिनेमा हॉलमध्ये चित्रपट दाखवण्याची आणि नंतर कदाचित त्यांना इतर उपकरणांकडे नेण्याची कल्पना मला आवडते. मला त्यावर विश्वास आहे.’

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !