‘कोरोना’ पॉझिटिव्ह झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नानावटी हॉस्पिटलमधून शेयर केला व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अ‍ॅक्टर अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन शनिवारी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढले. यानंतर त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. असे म्हटले जात आहे की, काल सायंकाळी अमिताभ यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. मात्र आता हॉस्पिटल प्रशासनाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. यादरम्यान, बिग बी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये ते नानावटी हॉस्पिटलच्या कोविड-19 वॉरियरर्सचे कौतूक करताना दिसत आहेत. अमिताभ ज्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत त्यासाठी बिग बी यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला होता. जो आता वायरल होत आहे.

या व्हिडिओत अभिताभ बच्चन डॉक्टर्सबाबत बोलत आहेत. व्हिडिओत बिग बी म्हणत आहेत – नमस्कार मी अमिताभ बच्चन. मी नानवटी हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स आणि स्टाफबाबत बोलू इच्छितो, जे या कठिण काळात अतिशय अवघड काम करत आहेत. नुकतेच मी ट्विटरवर लिहिेले होते, सूरज (गुजरात) मध्ये एक बिलबोर्ड लागला होता. तुम्हाला माहिती आहे मंदिर का बंद आहेत. कारण देव सफेद कोट परिधान करून काम करत आहेत. तुम्ही सर्व डॉक्टर्स, नर्सेस जेवढे लोक हॉस्पिटलमध्ये काम करत आहात, तुम्ही सर्व इश्वराचे रूप आहात. तुम्ही सर्वजण इतकी मेहनत मानवतेसाठी करत आहात. जीवनदायी बनले आहात. मी हात जोडून कौतूक करतो, नतमस्तक आहे तुमच्यासमोर. खुपच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही नसतात तर माहित नाही मानवता कुठे गेली असती.

अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मला माहित आहे हे दिवस थोडे निराशाजनक आहेत. सर्व लोक अवघड परिस्थितीतून जात आहेत. अनेकजण डिप्रेशनमधून जात आहेत. परंतु, प्लीज यामध्ये हिम्मत हारू नका. आपण सर्व सोबत आहोत आणि सोबत काम करत आहोत. आशा करतो की, लवकरच या स्थितीतून बाहेर येऊ. नानावटी हॉस्पिटलला माझ्याकडून धन्यवाद, येथे जे डॉक्टर, नर्सेस काम करत आहेत, मला या सर्वांकडून खुप चांगला अनुभव आहे. त्यांच्या सेवेसाठी माझ्याकडून धन्यवाद! मला माहिती आहे की, प्रेम आरोग्यासाठी किती जरूरी आहे. तुम्ही असेच काम करत राहा. संपूर्ण देश तुमच्याकडे आदराने आणि प्रेमाने पहात आहे. तुम्ही इश्वराचे रूप आहात आणि इश्वर सुरक्षा देतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like