‘बिग बी’ अमिताभ बच्चननं ‘फॅन्स’ची मागितली माफी, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड इंडस्ट्रिचे बिग बी अमिताभ बचन यांनी आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांचे चाहते प्रत्येक रविवारी त्यांच्या मुंबईच्या घराखाली जमतात, अमिताभ बच्चन त्यांना भेटण्यासाठी देखील येतात. परंतू यंदाच्या रविवारी ते आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांनी ट्विट करत यासंबंधित पोस्ट केली.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या घराबाहेर चाहत्यांनी जमू नये असे सांगितले होते परंतू असे असताना देखील चाहते रविवारी त्यांच्या घराबाहेर जमले होते. परंतू बिग बी त्यांना भेटायला घराबाहेर येऊ शकले नाहीत आणि याच कारणाने त्यांनी चाहत्यांची माफी मागितली. परंतू या मागचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.

अमिताभ बच्चन यांना संडे दर्शनचे फोटो ट्विट केले. त्यांनी याला कॅप्शन दिला की यानंतर देखील लोक रविवारी भेटण्यासाठी येत आहेत. मी माफी मागतो, मी बाहेर येऊ शकलो नाही.

अमिताभ यांनी दिली आपल्या तब्येतीची माहिती –
अमिताभ बच्चन शुक्रवारी (18 ऑक्टोबर) नानावती रुग्णालयात पोहचले, काही रिपोर्टनुसार ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. ते लीवरच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्यामुळे ते रुग्णालयात भरती झाले होते. परंतू आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अमिताभ यांची तब्येत खराब असल्याची माहिती कळाल्यावर चाहते नाराज होते, त्यानंतर त्यांची तब्येत सुधारली आणि ते घरी आले, त्यानंतर आपली तब्येत ठिक असल्याचे त्यांनी ब्लॉग द्वारे सांगितले.

अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, मला प्रेम देणाऱ्याचे मी आभार मानतो, त्यांना सर्वाना माझी काळजी आहे. त्यांना वाटते की माझी काळजी घेतली पाहिजे.

अमिताभ म्हणाले की प्रोफेशनल डॉक्यूमेंटेशनच्या पद्धती तोडू नका, तब्येत बिघडने आणि मेडिकल कंडिशन ही खासगी बाब आहे आणि जर तुम्ही व्यवसायिक फायद्यासाठी वापर करु इच्छित असाल तर हे चूकीचे आहे. सन्मान करा आणि समजून घ्या. जगात सर्वकाही विकाऊ नाही.

अमिताभ यांच्या या ब्लॉगमागे हे कारण आहे की त्यांच्या बाबत चूकीची माहिती बाहेर येत आहे, यामुळे अमिताभ नाराज आहेत.

Visit : policenama.com