‘बिग बी’ नावाबद्दल बोलले अमिताभ बच्चन, दिला आनंद महिंद्रांना हटके ‘जबाब’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक अभेनेता त्याच्या कलाकृतीने प्रेक्षकांवर भूरळ पाडत असतो. त्यांच्या या कलाकृतीने प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमे त्यांना एक निक नेम ठेवतात आणि ते अभिनेते त्या नावानेच पुढे प्रेक्षकांच्या समोर येतात. अशीच काही गोष्ट आहे जे अमिताभ बच्चनला ‘बिग बी’ असे नाव पडले. त्यांच्या अभिनयानेच त्यांना ‘बिग बी’ या नावाने ओळखले जाते. त्यांना हे नाव प्रसारमाध्यमांनी दिलेले आहे. आज प्रत्येक प्रेक्षक अमिताभ बच्चनला त्यांच्या ‘बिग बी’ या नावानेच ओळखतो. आनंद महिंद्रा जे महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जातात त्यांनी नुकताच ‘बिग बी’ चा उल्लेख करत एक ट्विट केलं आहे. या ट्विटला अमिताभ बच्चनने देखील रिप्लाय दिला आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विट मध्ये असे लिहिले आहे की, ‘माफी असावी अमितजी पण, या आठवड्यात एकच ‘बिग बी’ आहे ते म्हणजे ‘बिग बजेट’. प्रसारमाध्यमांसोबतच संपूर्ण देशाचे लक्ष ५ जुलै रोजी केंद्रीय सरकारकडून सादर होणाऱ्या नवीन बजेट कडे आहे. म्हणून सध्या सगळीकडे या बजेटचीच चर्चा सुरु आहे.

https://twitter.com/anandmahindra/status/1145580472338006016

आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला अमिताभ बच्चन यांनी हसत हसत उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘बिग बी हे प्रसारमाध्यमांनी मला दिलेले नाव आहे. मी या नावाशी कधीच सहमत नव्हतो. तुम्ही ज्या ‘बिग बी’ चा उल्लेख केला आहे तेच या आठवड्यात मीडियामध्ये दिसेल.’

https://twitter.com/SrBachchan/status/1145584018487832576

‘हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार