‘लॉकडाऊन’मध्ये ‘बिग बी’ अमिताभनं घेतला ‘हा’ धडा, म्हणाले – ’78 वर्षांतही एवढं शिकलो नसेल’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी लॉकडाऊनच्या काळातही घरात राहूनही अनेक गोष्टींवर काम केलं आहे. अनेक व्हिडीओज आणि केबीसीच्या प्रोमोमध्ये ते दिसले. त्यांनी सांगितलं आहे की, लॉकडाऊनमध्ये त्यांना मोठा धडा मिळाला आहे. त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत बिग बी यांनी लिहिलं की, “या लॉकडाऊनच्या काळात मी जेवढं काही शिकलो आहे ते मी 78 वर्षांच्या जीवनातही शिकलो नसेल. एवढी माहिती मला आतापर्यंत कधी भेटलीही नसेल. हे सत्य सांगणं हा धडा घेण्याचाच परिणाम आहे.”

बिग बींनी केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like