‘बिग बी’ अमिताभनं 50 हजारांमध्ये खरेदी केली दिव्यांगानं पायानं काढलेलं ‘पेटिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे महानायक आणि सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आपल्या कामाव्यतिरिक्त आपल्या छान स्वभावामुळे ओळखले जातात. ते शेतकरी, पूरग्रस्तांना आणि दुष्काळग्रस्तांना बर्‍याचदा देणगी देत असतात. अलीकडेच अमिताभ यांनी असे काही केले ज्याने सर्वांचे मन जिंकले. एक दिव्यांग आपली पेंटिंग घेऊन अमिताभ यांच्याकडे पोहोचला आणि अमिताभ यांनी ही पेंटिंग 50 हजार रुपयांमध्ये विकत घेतली.

पेंटिंग करणाऱ्या दिव्यांग आयुषला हात नाहीत व तो पायांनी पेंटिंग करतो. आयुषने आपल्या पायाने अमिताभ यांची पेटिंग बनवली होती. ज्याला पाहिल्यानंतर बिग बी यांनी त्याला मुंबईत बोलावले आणि 20 मिनिटे त्याला भेटले, आयुषाने पायांनी अमिताभ बच्चन यांची एक पेटिंग बनविली. जेव्हा अमिताभ यांनी आयुषची पेटिंग पाहिली तेव्हा ते त्याच्याकडे पहात राहिले. आयुषने अमिताभ यांची ही पेंटिंग त्यांच्या कौन बनेगा करोडपती लूकसारखी केली होती.

आयुषची आई सरोज कुंडल यांनी सांगितले की, त्याचा अनुभव खूप चांगला होता आणि त्याला खूप आनंद झाला. त्या क्षणाचे वर्णन शब्दात करु शकत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहून तुम्ही देखील स्तब्ध झाले असता.’

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर ते लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. अयान मुखर्जी हे चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अमिताभ ‘बटरफ्लाय’, ‘गुलाबो सीताबो’, ‘झुंड’, ‘चेहरे’ आणि ‘एबी यानि सीडी’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत.