‘बिग बी’ अमिताभच्या ‘सरकार’ सिनेमाला 15 वर्षे पूर्ण ! कवितेतून व्यक्त केल्या भावना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सरकार या सिनेमाला आज (दि 2 जुलै) 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं बिग बींनी सोशलवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशलवर चर्चेत आहे.

अमिता बच्चन यांनी सरकार सिनेमाचं पोस्ट शेअर करत एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काही हिंदी काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. बिग बी लिहितात-

“घड़ियाँ दिन की बीत जाती हैं
सालों बाद, छवि उनकी सामने आती है
याद आते हैं वो क्षण,
वो चित्रण, अर्पण, दर्पण
कारण था प्राण, समर्पण, स्पष्टीकरण,
की यही हो उदाहरण,
इस रूपांतरण का आभूषण फिल्मीकरण,
चले वर्षों, रहे आमरण !!
मंगलाचरण, मंगलाचरण, मंगलाचरण”

सरकार हा सिनेमा राम गोपल वर्मांनी डायरेक्ट केला होता. हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा होता. बिग बींनी यात सभाष नागरेची भूमिका साकारली होती. या सिनेमात अभिषेक बच्चनही होता. त्यानं सुभाष नागरेच्या लहान मुलाची भूमिक साकारली होती.

सरकारचे आतापर्यंत आलेत 3 सिनेमे

2005 साली सरकार सिनेमा आला होता. यानंतर 2008 साली सरकार राज आणि 2017 साली सरकार 3 हा सिनेमा आला होता.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकताच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like