क्रितीच्या बोल्ड फोटोवरची ‘बिग बी’ची कमेंट पाहून युजर्स ‘सैराट’, म्हणाले – ‘दीदी तेरा दादू दीवाना’

पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री क्रिती सनॉनच्या फोटोवर कमेंट करणे बिग बी अमिताभ बच्चन यांना चांगलेच महागात पडले आहे. क्रिती सनॉनने बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर केल्यानंतर तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. क्रितीचे बोल्ड फोटो पाहून अमिताभ बच्चन यांनाही राहावले नसल्याने त्यांनीही क्रितीच्या फोटोंवर कमेंट केली. मात्र या कमेंटमुळे अमिताभ जबरदस्त ट्रोल झाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी यावरून अमिताभ यांची चांगलीच मजा घेतली आहे. दीदी तेरा दादू दीवाना अशा शब्दात एका युजरने अमिताभ यांना ट्रोल केले.

अमिताभ बच्चन यांनी क्रितीच्या फोटोवर WOW अशी कमेंट केली. त्यांची ही कमेंट पाहून युजर्स असे काही सैराट झालेत की क्षणभर बच्चन यांना कमेंट केल्याचा पश्चाताप झाला आहे. एका युजरने बच्चन साहब मौज में… जया और रेखा क्रिती सनॉन के खोज में, असे लिहत अमिताभ यांची मजा घेतली आहे. तर दीदी दादू की भावनाओं मे सम्मान है आपके लिए Wow अशी मजेदार कमेंट केल्याचे म्हटले आहे. काही युजर्स मात्र अमिताभ यांचा बचाव करताना दिसले. अमिताभ यांच्या कमेंटमध्ये चुकीचे काय हेच मला कळत नाही, असे लिहून अनेकांनी ट्रोलर्सला सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच ती आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपस्टार प्रभास आणि सैफ अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.